प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात : पेट्रोलमध्ये सर्रास मिसळले जाते रॉकेल भंडारा : शहरातील काही आॅटोवाले पैसे वाचविण्यासाठी पेट्रोलमध्ये रॉकेल घालत असल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे. पोलीस व प्रशासनही याकडे डोळे झाक करीत असल्याने या समस्येत भर पडताना दिसत आहे. शहर प्रदूषणमुक्त असावे, असे वाटत असताना काही आॅटोवाले शहराची वाट लावत आहेत.रस्त्यावरून आॅटो जो धूर सोडतात त्यामुळे मागून येणाऱ्या वाहन चालकांना श्वासोच्छवासाचा त्रास सहन करावा लागतो. मॉर्निंग वॉक किंवा ईव्हीनिंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्यांसोबत सर्वांचेच आरोग्य या प्रदूषणामुळे धोक्यात आले आहे. एकीकडे कष्टकऱ्यांना चुल पेटविण्यासाठी रॉकेल मिळत नाही. तर दुसरीकडे आॅटो चालकांना रॉकेल सहजतेने उपलब्ध होवून जाते. लाभार्थ्यांचे रॉकेल सर्वसामान्यांना दिले जात नसल्याचा हा प्रकारच म्हणावा लागेल. (प्रतिनिधी)
धूर सोडतोय आॅटोवाला
By admin | Updated: January 20, 2015 22:31 IST