पाणीप्रश्न भेडसावतोयपावसाअभावी सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर, ६३ प्रकल्पांत १५ टक्के जलसाठादेवानंद नंदेश्वर भंडाराहिवाळी ऋतू दोन महिन्यावर येऊन ठेपला आहे. ऐन पावसाळ्यात आॅगस्ट महिन्यापर्यंत पावसाने दडी मारलेली आहे. शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहे. जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे़ शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ १५.४२ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात ३०.५४ टक्क्यानी घट झालेली आहे.लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत़ या प्रकल्पात केवळ ८.१८ टक्के जलसाठा आहे. यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा, मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरना प्रकल्पाचा समावेश आहे़ सध्यस्थितीत चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी ८़६४, बघेडा २२़१६, बेटेकर बोथली निरंक आणि सोरना जलाशयात उपयुक्त जलसाठा निरंक आहे़जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे़ सध्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा २२़६८ टक्के आहे़ माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा १५.४२ टक्के आहे़ जिल्ह्यातील ३१ लघु प्रकल्पांमध्ये तुमसर तालुक्यातील कुरघडा, कवलेवाडा, पवनारखारी, आंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली. मोहाडी तालुक्यातील नागठाणा, टांगा, हिवरा. भंडारा तालुक्यातील आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, रावणवाडी, सिल्ली आंबाडी. पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, कार्तुली, पिलांद्री, साकोली तालुक्यातील शिवणीबांध, कुंभली, गुढरी लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी तर लाखनी तालुक्यातील भूगाव मेंढा, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, न्याहारवानी, वाकल, खुर्शिपार या प्रकल्पांचा समावेश आहे. गोसखुर्द धरणाचे पाणी अडविण्यात आले असल्याने वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे़ असे असले तरी शहरातील नागरिकांना पाण्याची टंचाई भासत आहे. जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात केवळ १८़७७० दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ गतवर्षी २ आॅगस्ट रोजी ६३ प्रकल्पात ५५.९५४ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा होता़ त्याची टक्केवारी ४५.९६ एवढी होती. यावर्षी अनेक प्रकल्पांमध्ये पाण्याचा अल्प साठा आहे.
६३ पैकी ४८ प्रकल्पांत अत्यल्प जलसाठा
By admin | Updated: August 3, 2015 00:28 IST