शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पोटाच्या भारावर झोपण्याच्या पद्धतीने वाढते शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 05:00 IST

नैसर्गिक पद्धतीने जीवनशैली जगावी तरच मानवी शरीरही आपल्याला साथ देते. नैसर्गिक पद्धतीनेच शरीरातील व रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कसे समतुल्य रहावे, याचा प्रयत्न केला पाहिजे. पोटाच्या भारावर कोविड रुग्णाला झोपविल्यास त्याचा त्याला तत्काळ फायदा होऊ शकतो. सरळ झोपल्यावर शरीरात ६० ते ६५ टक्के ऑक्सिजन मिळते; परंतु त्याच कोविड रुग्णाला पालथे झोपायला लावल्यास ९५ टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन लेव्हलची मात्रा येऊ शकते.

ठळक मुद्देसवय बदला- जीवन बदलेल : तर कोविड रूग्णाला होऊ शकतो तात्काळ फायदा

इंद्रपाल कटकवारलोकमत न्युज नेटवर्कभंडारा : आजच्या वैश्विक कोरोना महामारीच्या जगतात मानवाला अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. मानवी आरोग्याच्या दृष्टीने  शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण योग्य प्रमाणात ठेवणे हे सर्वांत मोठे आव्हान ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर फिजिओथेरपिस्ट तथा वैद्यकीय तज्ज्ञांनी रुग्णाला तत्काळ दिलासा मिळू शकतो, असा उपाय सुचविला आहे. पोटाच्या भारावर झोपण्याच्या पद्धतीने शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते, असा सल्ला दिला आहे. बदलत्या काळानुरूप सवयी बदलल्या.  नैसर्गिक पद्धतीने जीवनशैली जगावी तरच मानवी शरीरही आपल्याला साथ देते. नैसर्गिक पद्धतीनेच शरीरातील व रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कसे समतुल्य रहावे, याचा प्रयत्न केला पाहिजे. पोटाच्या भारावर कोविड रुग्णाला झोपविल्यास त्याचा त्याला तत्काळ फायदा होऊ शकतो. सरळ झोपल्यावर शरीरात ६० ते ६५ टक्के ऑक्सिजन मिळते; परंतु त्याच कोविड रुग्णाला पालथे झोपायला लावल्यास ९५ टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन लेव्हलची मात्रा येऊ शकते. पोटाखाली उशी घेतल्यानंतर आपण किती वेळ तसं राहू शकतो याची कल्पनाही रुग्णाला मिळते, त्यानुसार तो अधिक सोयीने ही पद्धत अवलंबू शकतो. घरच्या घरी होम आयसोलेशनमधील रुग्ण हे अधिक सोयीस्करपणे करू शकतात. 

असा वाढवा रक्तातील ऑक्सीजनरुग्णाला झोपतानाही त्याच्या पोटाखाली एक उशी ठेवावी श्वासोच्छवास करताना श्वसन प्रक्रिया सामान्यपणे ठेवावी तीस मिनिटे ते दोन तास पूर्णतः पोटाच्या 12 वर तर तेवढ्यात कालावधी उजव्या बाजू वर झोपून पूर्ण करावा असे करताना आपले डोकं खालच्या बाजुला असेल याची काळजी घ्यावी रुग्णाच्या सोयीनुसार अशी प्रक्रिया वारंवार करावयास लावावी. काेरोनाबाधित पेशंटला १२ ते १५ तास पालथे झोपणे गरजेचे आ.हे तरच रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण झपाट्याने वाढू शकते. 

पालथे झोपण्याचे फायदे   कोविड रुग्णाने पालथे झोपणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण योग्य प्रमाणात राहते. असे केल्यास ऑक्सिजनचे प्रमाण कमी असलेल्या  रुग्णाचे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढत असते. भरती असलेल्या किंवा गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांचे   ऑक्सिजनचे प्रमाणही वाढू शकते. ही प्रक्रिया सामान्यपणे व कुठलाही मानसिक तणाव न ठेवता करावी. फिजिओथेरपी करताना अशी पद्धती वापरली जाते. या पध्दीचा कुठलाही   साईड इफेक्ट होत नाही.-  डॉ. दिलेश वंजारी,  फिजिओथेरपिस्ट, भंडारा.

डॉक्टरांवर विश्वास ठेवारुग्णाला पोटाच्या भारावर झोपण्यासाठी आधीच प्रवृत्त केले पाहिजे. या पद्धतीने रुग्णाला लवकरच फायदा होऊन ऑक्सिजनचे प्रमाण सुधारण्यास मदत होते ही झटपट बाब प्रत्येकालाच सांगितली पाहिजे. घरी विलगीकरणात असलेल्या रू्ग्णांसाठी ही बाब तर अधिक सोपी व सहज आहे. डॉक्टरांवर विश्वास, नियमित औषधोपचार ठेवल्यास रूग्ण लवकरच बरा होतो.- डॉ. नितीन तुरस्कर, अध्यक्ष, आयएमए, भंडारा

ही तर संजीवनीचकोविड रूग्णाला पालथे झोपायला सांगितल्यास   त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. लहान बालके बहुतांश पोटाच्या भारावर झोपत असतात. पालथे झोपू नको, असे बजावतही असतो. मात्र पोटाखाली उशी  ठेवून झाेपल्यास शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण योग्य राहते, असा निष्कर्ष ही आता काढण्यात आलेला आहे कोविंड रूग्णांसाठी ही पद्धत संजीवनीच आहे- डॉ.अमित कावळे, बालरोग तज्ज्ञ, भंडारा

 

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजनcorona virusकोरोना वायरस बातम्या