मोहाडी पोलिसांची कारवाई : रात्री एक वाजता पकडली चोरीलोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : मोहाडी तालुक्यात गौण खनिजांची खुलेआम चोरी होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र अवैध गौण खनिजांची वाहतूक काही करून थांबताना दिसत नाही. गुप्त माहितीच्या आधारे ७ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घाटकुरोडा येथे मोहाडीचे ठाणेदार प्रदीपसिंह परदेशी यांनी धाड घातली. यात जेसीबीने मुरुम खोदून ट्रॅक्टरमध्ये भरीत असल्याचे आढळले. परवानगीचे कागदपत्र नसल्याने एक जेसीबी व तीन ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात येवून त्यांना मोहाडी पोलीस ठाण्यात आणले. तत्पूर्वी ६ मे च्या रात्री सुद्धा कारवाई करून तीन ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले होते. एकुण सहा ट्रॅक्टर व एक जेसीबी मोहाडी पोलीसांनी जप्त केले आहे. रेतीघाटातून सुद्धा याच प्रकारे रात्रीच्या सुमारास रेतीची चोरी करून वाहतूक करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. घाटकुरोडा शिवारातून विनापरवानगीने मुरुम खोदून त्याची वाहतूक अनेक दिवसांपासून सुरु होती. हा मुरुम एका कालव्याच्या कामावर नेण्यात येत होते असे त्या ट्रॅक्टरचालकाचेम्हणणे आहे. या कारवाईत ट्रॅक्टर ट्रॉली क्र. एम.एच. ३६ जी ३३८८ चालक सोमेश्वर सहसराम सेलोकर मु.रोहा, ट्रॅक्टर क्र. एम.एच. ३६ एल ५४८४ चालक जोशी, डोलीराम बुधे रा.ढोरवाडा, ट्रॅक्टर क्र. एम.एच. ३६ एल १८४३ चालक खुशाल सहादेव सेलोकर मु.रोहा, ट्रॅक्टर क्र.एम.एच. ३६ - ४२२६ चालक विजय पुरुषोत्तम गाढवे रोहा, तसेच ट्रॅक्टर व ट्रॉली क्रमांक नसलेल्या ट्रॅक्टर चालक रोशन सहेतराम बोडले व वासुदेव रामभाऊ गाढवे रा.रोहा यांच्यासोबत जेसीबी क्र.एम.एच. ३६, एल - ८३१६ चालक रामू हलके पटेल रा.नयनपूर मध्यप्रदेश यांचे ट्रॅक्टर व जेसीबी जप्त करण्यात आले आहे. हे प्रकरण तहसीलदार मोहाडी तसेच खनीकर्म अधिकारी भंडारा यांना वर्ग करण्यात येऊन ज्यांच्याकडे वाहन परवाना, गाड्यांचे कागदपत्र नाही व ज्यांच्या वाहनावर नंबरप्लेट नाही अशा वाहन मालकावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असे ठाणेदार प्रदीपसिंह परदेशी यांनी सांगितले. ही कारवाई ठाणेदार प्रदीपसिंह परदेशी, पोलीस हवालदार जागेश्वर मोहतुरे, सुनिल कासदा, वाहनचालक गौतम रोडगे, मिथून चांदेवार, आशिष तिवाडे, चालक जतीन दासानी यांच्या चमूने रात्री एक वाजताच्या सुमारास केली.विना नंबरप्लेटची वाहनेग्रामीण भागातील बहुतांश ट्रॅक्टर व ट्रॉलीवर नंबरच लिहिलेला नसतो व असे ट्रॅक्टर भरधाव वेगाने रस्त्यावर धावत असतात. एखादवेळ अपघात घडला तर नंबर नसल्यामुळे त्या ट्रॅक्टरला पकडणे मोठे आव्हान असते. आरटीओ कडून नंबर मिळाल्यानंगतरही अनेक ट्रॅक्टर मालक वाहनांवर नंबर लिहीत नाही. त्यामुळे अशा ट्रॅक्टरवर शोध मोहीम घेवून कारवाई करणे गरजेचे झाले आहे. पकडण्यात आलेल्या सहा ट्रॅक्टरपैकी तीन चार ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर नंबरच नाही. तर दोन ट्रॅक्टरवर नंबर लिहिलेला नाही. विना नंबरच्या दुचाकी चालविण्याचाही एक फॅशन झालेला आहे.
सहा ट्रॅक्टर, जेसीबी ठाण्यात जमा
By admin | Updated: May 10, 2017 00:25 IST