बिबट्याचा धुमाकूळ सुरूचसाकोली : दिवाळीनंतर वनविभागाची अक्षरश: झोप उडाली आहे. सकाळ झाली की बिबट्याच्या शिकारीच्या घटनेने वनविभाग हादरून जात आहे. महिनाभरापुर्वी घडलेला प्रकार पुन्हा सुरू झाला आहे. जांभळी परिसरानंतर आता घानोड, आमगाव परिसरात बिबट्याने दि.२२ च्या रात्री एकाचवेळी सहा शेळ्याची शिकार केल्याने परिसरात पुन्हा दहशत पसरली आहे.एक महिन्यापुर्वी जांभळी येथे जेरबंद असलेल्या बिबट्याने सुरवातीला शेळ्या, कुत्रे, याना भक्ष्य बनविले होते. त्यानंतर त्याने एका महिलेची शिकार केली. यापुर्वी दि.१६ ते १८ ला तिरंगी टेकाम व छोटेलाल रहांगडाले यांच्या शेळ्या तर प्रल्हाद बनकर यांच्या बैलाला ठार केल्याची घटना घडली. काल दि.२२ च्या रात्री सुरेश कापगते यांच्या दोन शेळ्या, ज्ञानेंद्र मेश्राम यांची एक शेळी, लता नेवारे यांची एक शेळी सर्व रा.आमगाव, नामदेव डोंगरवार रा.घानोड यांची एक शेळी तर मश्जीद गायकवाड रा.आमगाव यांची एक शेळी अशा सहा शेळ्या एकाच रात्री फस्त केल्या आहेत. त्यामुळे जांभळी व खांबा आणि आमगाव परिसरात दहशत पसरली आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
आमगावात एकाच रात्री सहा शेळ्या फस्त
By admin | Updated: November 24, 2014 22:51 IST