शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

सर्वधर्र्मीय विवाह सोहळ्यात सहा जोडपी विवाहबद्ध होणार

By admin | Updated: April 22, 2016 01:59 IST

विदर्भात घोड्याची यात्रा म्हणून प्रख्यात असलेल्या अड्याळ येथील यात्रा महोत्सवात यावर्षी सर्वधर्मिय विवाह सोहळ्यात सहा जोडपी

विशाल रणदिवे ल्ल अड्याळ विदर्भात घोड्याची यात्रा म्हणून प्रख्यात असलेल्या अड्याळ येथील यात्रा महोत्सवात यावर्षी सर्वधर्मिय विवाह सोहळ्यात सहा जोडपी विवाहबद्ध होणार आहे. सामूहिक विवाह सोहळ्यापूर्वी पहाटे ४ वाजतापासून हनुमान जन्मोत्सव, ८ वाजता सुंदरकांड, १२ वाजता सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.घोडायात्रानिमित्ताने १५ दिवसांपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्री बालाजी रथयात्रा, भागवत सप्ताह श्रीरामनवमी उत्सव, हनुमान जयंती उत्सव आयोजित करण्यात आले होते. या घोडायात्रेला विदर्भातील लाखो भाविकांनी हनुमंताचे दर्शन घेतले. या यात्रेचा भाग म्हणून अड्याळ येथे १९९६ पासून विवाह सोहळ्याची परंपरा वाजत गाजत सुरू असून गेल्या २० वर्षापासून ग्रामविकास एकात्मता समितीच्यावतीने आजपर्यंत ३४६ जोडपे विवाह बंधनात अडकले.विवाह सोहळ्याप्रसंगी खासदार नाना पटोले, माजी राज्यमंत्री विलास श्रृंगारपवार, जि.प. उपाध्यक्ष राजेश डोंगरे, माजी आमदार डॉ.हेमकृष्ण कापगते, दुध संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये, जिल्हा परिषद सदस्य युवराज वासनिक, माजी उपसभापती शिवशंकर मुंगाटे, डॉ.भैय्यामोहन क्षीरसागर, हनुमान मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष भास्करराव पोटवार, मधुकर निकुरे, देविदास नगरे उपस्थित राहतील. यावेळी अतिथींच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. विवाह सोहळ्यातील नवदांपत्यांना अड्याळ ग्रामपंचायत, अड्याळ पोलीस ठाणे, हनुमान मंदिर देवस्थान समितीकडून गृहउपयोगी वस्तु भेट देण्यात येणार आहेत. यावेळी किशोर देवयीकर महाराज, अशोक सलुजा, सुर्ववंशी महाराज व मुनेश्वर बोदलकर उपस्थित राहणार आहेत. या सात दिवस चालणाऱ्या महायज्ञात हभप विलास लिल्हारे महाराज यांचे दैनंदिन प्रवचन या सप्ताहात पर्वनी ठरली. तसेच सातही दिवस हनुमान मंदिरात महिला मंडळातर्फे सुंदरकांड, ग्रामसफाई, भजन जागरण, काकड आरती, हरिपाठ, घटस्थापना आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (वार्ताहर)