शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भावाच्या मृत्यूची बातमी कानी पडताच बहिणीने सोडला प्राण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 14:33 IST

Bhandara : भाऊ मृत झाल्याचे ऐकता दोन तासांतच त्यांचाही झाला मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (भंडारा): भावाच्या निधनाची बातमी कानी पडताच बहिणीनेसुद्धा प्राण सोडले. गुरुवार, २६ जूनला दुपारी मोतीराम कुसन राऊत (८०, पालांदूर) यांचे निधन झाले. ही बातमी वळद (ता. साकोली) येथे राहणारी त्यांची थोरली बहीण भागरथा ऊर्फ मकूबाई नथुजी नेवारे (८५) यांच्या कानी पडताच, त्यांचेही निधन झाले.

बहीण-भावाचे नाते हे केवळ रक्ताचे नसते तर ते प्रेम, जिव्हाळा आणि समर्पणाने गुंफलेले असते. मोठी बहीण लहान भावासाठी आईचे दुसरे रूप असते. तिच्या मायेची उब, काळजी आणि आशीर्वाद हे भावासाठी ईश्वराची छाया ठरतात. मोतीराम कुसन राऊत गुरुजी यांच्या वृद्धापकाळाने निधन झाल्याची बातमी नातलगांना कळविण्यात आली.

त्यांच्या निधनाची बातमी बहिणीच्या घरी कळविण्यात आली. मात्र मामाच्या निधनाची बातमी आईला कळल्यास ती दुःखी होईल म्हणून तिला मुद्दाम न सांगता कुटुंबीय पालांदूर येथे अंत्यविधीकरिता पोहोचले. इकडे रात्री जेवणाच्या वेळी परिवार एकत्र नसल्याने भागरता ऊर्फ मकूबाईने विचारणा केली, तेव्हा नातीने तुमचा मास्तर (गुरुजी) भाऊ मृत पावल्याचे सांगितले. ही बातमी ऐकताच त्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर दोन तासांतच त्यांचाही मृत्यू झाला. मकूबाई व मोतीराम राऊत या बहीण-भावाच्या निधनाची बातमी पालांदूर व वडद येते चर्चेची ठरली. दोघांचेही अंत्यविधी त्यांच्या गावी पार पडले. या दुहेरी दुःखामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा