शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

साहेब, जीव गेल्यावर मजुरी देणार काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 06:00 IST

पवनी तालुक्यातील अड्याळ, केसलापुरी, कलेवाडा, खैरी, कमकाझरी आणि केसलवाडा या सहा गावातील मजूर व काही ग्रामस्थ आळीपाळीने कामे करतात. त्यात रोपे लावण्यापासून ते त्याचे संवर्धन करणे इत्यादी कामे केली जातात. परंतु सर्व काही सुरळीत सुरू असताना त्या मजुरांना जर मजुरी मिळत नसेल तर उदरनिर्वाह कसा करावा, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देसामाजिक वनीकरण विभागाला मजुरांचा सवाल : भिवखिडकी रोपवाटिकेतील प्रकरण

विशाल रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : सामाजिक वनीकरण भंडारा परिक्षेत्र पवनी अंतर्गत आधुनिक रोपवाटिका भिवखीडकी येथे विविध योजनेअंतर्गत ठिकठिकाणी रोपांची लागवड व संवर्धन मजुरांमार्फत करण्यात आले. मात्र त्या कामाच्या मोबदला अजुन न मिळाल्याने मजूर संतप्त झाले असून, ‘साहेब, जीव गेल्यावर मजूरी देणार काय? असा सवाल सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारीत आहे.पवनी तालुक्यातील अड्याळ, केसलापुरी, कलेवाडा, खैरी, कमकाझरी आणि केसलवाडा या सहा गावातील मजूर व काही ग्रामस्थ आळीपाळीने कामे करतात. त्यात रोपे लावण्यापासून ते त्याचे संवर्धन करणे इत्यादी कामे केली जातात. परंतु सर्व काही सुरळीत सुरू असताना त्या मजुरांना जर मजुरी मिळत नसेल तर उदरनिर्वाह कसा करावा, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी त्यांना थेट वनसंरक्षक सामाजिक वनीकरण विभाग नागपूर, जिल्हाधिकारी भंडारा तथा लागवड अधिकारी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र पवनी यांच्याकडे निवदेनातून हक्काची मजुरी मिळावी यासाठी याचना करीत असतील तर यापेक्षा शोकांतिका काय असणार ?भिवखीडकी रोपवाटिकेच्या कमात लाखोंची अफरातफर झाल्याचीही चर्चा आहे. मात्र याबाबत अधिकारी ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहे. नोव्हेंबर २०१८ ते जुलै २०१९ पर्यंत मजूर राबराब राबले. त्यापैकी तेथील मजुरांना फेब्रुवारी २०१९ पर्यंत मजुरीचे पैसे मिळाले. परंतु मार्च महिन्यापासून अद्याप मजुरी मिळाली नाही. येथील ४० मजूरांनी आपल्या हक्काच्या मजुरी मिळण्यासाठी ९ आॅक्टोबर रोजी वरिष्ठांना निवेदन दिले आहे. दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊनही मजूर वर्गाला न्याय मिळालेला नाही. मजुरांनी न्याय मागायचा तरी कुणाकडे, अशी स्थिती निफर्माण झाली आहे. तसेच याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.दिवाळी सारख्या सणालाही हक्काच्या मजुरीचे पैसे द्यावे असे निवेदनात म्हटले होते. मात्र दिवाळी होऊन महिनाभराचा कालावधी लोटला. काहीच झाले नाही. वारंवार लागवड अधिकारी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र पवनी शंकर धोटे यांना याविषयी विचारण्यात येते तेव्हा वनविभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण भंडारा यांच्या कडून मजुरीची रक्कम मिळताच आपल्या खात्यात टाकण्यात येईल, अशी उत्तरे मिळत आहेत. ही बाबही मजुरांनी निवेदनात नमूद केली आहे. यासंदर्भात रोपवाटिकेत काम करणाºया मजुरांची मजुरी मिळाली नसल्याबाबत वरिष्ठांना पत्रव्यवहार केला असल्याचे पवनी येथील सामाजिक वनीकरण परिक्षेत्राचे अधिकारी एस. डी. गुप्ता यांनी सांगितले.

टॅग्स :forest departmentवनविभाग