शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

साहेब, घरकुल तेवढं द्या, जिदंगीभर नाव राहील तुमचं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:00 IST

लाखांदूर तालुक्यातील काेदामढी येथील नाथजाेगी समाजाच्या बेड्यावर शनिवारी जिल्हाधिकारी संदीप कदम पाेहाेचले. त्यावेळी तेथील महिलांनी समस्यांचा पाढा जिल्हाधिकाऱ्यांपुढे वाचला. लाखांदूर तालुक्यात गत काही वर्षांपासून झाेपडीवजा घरात नाथजाेगी समाजाची कुटुंब राहतात. भीक मागून उदरनिर्वाह करणे, हाताला मिळेल ते मजुरी करणे अशी त्यांची दीनचर्या आहे.

ठळक मुद्देकाेदामढीला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

दयाल भाेवतेलोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : भीक मागून कुटुंबासह उदरनिर्वाह करताे. राहते घर नाही, ताडपत्रीच्या झाेपडीत कसेबसे राहताे. जमिनीचा पट्टा नाही म्हणून घरकुल मिळत नाही. घरकुल तेवढ द्या साहेब जिंदगीभर नाव राहील तुमचं अशी आर्त विनवणी नाथजाेगी समाजातील महिला जिल्हाधिकाऱ्यांना करीत हाेत्या. संवेदनशील जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या सर्व समस्या ऐकून घेतल्या. लाखांदूर तालुक्यातील काेदामढी येथील नाथजाेगी समाजाच्या बेड्यावर शनिवारी जिल्हाधिकारी संदीप कदम पाेहाेचले. त्यावेळी तेथील महिलांनी समस्यांचा पाढा जिल्हाधिकाऱ्यांपुढे वाचला. लाखांदूर तालुक्यात गत काही वर्षांपासून झाेपडीवजा घरात नाथजाेगी समाजाची कुटुंब राहतात. भीक मागून उदरनिर्वाह करणे, हाताला मिळेल ते मजुरी करणे अशी त्यांची दीनचर्या आहे. त्यांच्याकडे काेणतीही कागदपत्रे नसल्याने शासकीय याेजनांचा लाभ मिळत नाही. ही माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांना हाेताच शनिवारी थेट काेदामढी बेडा गाठला. यावेळी तेथे असलेल्या महिला व पुरुषांनी त्यांच्यापुढे आपल्या समस्या सांगितल्या. अनेकांकडे आधारकार्ड नाही, रेशनकार्डचा पत्ता नाही. संजय गांधी निराधार याेजनेसह श्रावणबाळ याेजनेचा लाभ मिळत नाही, असे सांगितले. यावेळी कार्तिक नामक तरुणाने जात प्रमाणपत्र उपलब्ध झाले असले तरी जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याचे सांगत हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण काेदामढी गाव फिरून नाथजाेगी कुटुंबाच्या झाेपड्यांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासाेबत साकाेलीच्या उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, तहसीलदार अखिल भारत मेश्राम, उमेदचे नरेंद्र कडबरैये, आदी कर्मचारी उपस्थित हाेते. 

लाेकांचे भविष्य सांगणारेच अंधारात नाथजाेगी समाजाचा परंपरागत व्यवसाय म्हणजे हस्तरेषा पाहून भविष्य सांगणे. वर्षानुवर्षे या गावाहून भटकत नागरिकांचे भविष्य सांगत त्यावर गुजरान करतात. परंतु, आधुनिक काळात त्यांच्या भविष्यावर कुणी विश्वास ठेवायला तयार नाही. त्यामुळे त्यांच्या हाताला काम मिळत नाही. लाेकांचे भविष्य सांगणाऱ्यांचेच भविष्य आता अंधकारमय झाल्याचे दिसत आहे. आता जिल्हाधिकारी या समाजासाठी काय करतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजनाcollectorजिल्हाधिकारी