शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सिहोऱ्यात शेकडो लिटर दूध ओतले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 22:17 IST

दूध शितकरण गृहात तांत्रीक बिघाड आल्याचे कारण देत दुध संघाने रविवारी जिल्ह्यातील दुध खरेदीस नकार दिल्याने शेकडो लिटर दुध रस्त्यावर प्रवाहित करण्यात आले.

ठळक मुद्देदुग्ध संघाचा दूध घेण्यास नकार

आॅनलाईन लोकमतचुल्हाड (सिहोरा) : दूध शितकरण गृहात तांत्रीक बिघाड आल्याचे कारण देत दुध संघाने रविवारी जिल्ह्यातील दुध खरेदीस नकार दिल्याने शेकडो लिटर दुध रस्त्यावर प्रवाहित करण्यात आले. तुमसर तालुक्यातील सिहोरा येथे सदर पशुपालकांनी जिल्हा दुध संघाचा निषेध नोंदविला.शेतीला पुरक व्यवसाय म्हणून सिहोरा परिसरासह जिल्हयात हजारो शेतकरी पशुपालन व दुग्ध व्यवसाय करतात. दुष्काळी परिस्थितीत हाच व्यवसाय शेतकºयांना आधार देतो. येथील शेतकºयांनी कर्ज घेवून गायी, म्हशी घेतले आहे. यावर्षी धान शेतीने धोका दिला. रब्बी पीकही अवकाळी पावसाच्या फटक्याने होण्याचे नव्हते झाले. अशा स्थितीत शेतकºयांना दुध व्यवसाय आधार देत आहे. यातूनच बहुतांश शेतकरी कुटूंबाचा रथ हाकत आहेत.यापूर्वी शासनाने दुधाचे भाव कमी केले. यातच पशु खाद्याचे वाढते दर शेकºयांची चिंता वाढविणारे आहे. आणि आता दुध संघानेही शेतकºयांच्या चिंतेत भर घातली आहे. महिना-पंधरा दिवसातून एक-दोन दिवस दुध खरेदी बंद ठेवली जाते. विशेष म्हणजे शेतकºयांना खरेदी बंद असल्याची कोणतीच पुर्व सूचना दिली जात नाही. रविवारलाही असेच झाले.ग्रामीण भागातील अनेक शेतकºयांनी सिहोरा येथील पाच दुग्ध डेअरी मध्ये सकाळी दुध घेऊ न आले. मात्र दुध डेअरी संचालकांनी वेळेवरच दुध खरेदी बंद असल्याचे सांगितले. यामुळे शेतकरी संतप्त झाले. यावेळी अनेक शेतकºयांनी दुध रस्त्यावर ओतून दिले.दुध पावडर बनविण्यात येणाºया मशिनीमध्ये बिघाड आल्यामुळे दुग्ध संघाकडे क्षमतेपेक्षा जास्त दूध संकलित झाले होते. सोमवारपासून नियमितपणे दूध संकलन केले जाणार आहे. शेतकºयांच्या हितासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. सिहोरा येथे घडलेल्या प्रकाराची माहिती अजुनपर्यंत प्राप्त झालेली नाही.- करण रामटेके, व्यवस्थापक, जिल्हा दुग्ध संघ, भंडारा.