शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

गुरढा ते मेंगापूर रस्त्याची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2022 05:00 IST

खरे तर या रस्त्याचे विस्तारीकरण झालेले नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाची उदासीनता दिसून येते. आधीच रस्ता अरुंद असून, त्यातही डांबर निघाल्याने ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याला डांबराचा काही ठिकाणी मुलामा लावण्यात आल्याने तोही निघाला आहे. त्यामुळे दुचाकी घसरून अपघातही घडले आहेत. अनेकजण जखमीही झाले आहेत. मात्र या रस्त्याच्या पुनर्बांधणीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष दिसून येते.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था कायम आहे, असे म्हणणे काही चुकीचे ठरणार नाही. लाखनी तालुक्यातील गुरढा ते मेंगापूर (पालांदूर)या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. ठिकठिकाणी डांबराचे सालटे निघाल्याने दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे.माहितीनुसार, ग्रामीण रस्त्यांची अवस्था फारशी चांगली नाही. काही रस्त्यांची अंतर्गत स्थिती सुधारण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या जोडरस्त्यांची अधिक दखल घेतली जात आहे. मात्र याबाबतीत गुरढा ते पालांदूर रस्ता तेवढा नशीबवान नाही. राष्ट्रीय महामार्गावरील मानेगाव सडक ते पोहरापर्यंतचा रस्ता अत्यंत गुळगुळीत आहे, मात्र त्यानंतर गुरढा ते मेंढापूर- पालांदूरपर्यंतचा मार्ग खडतर आहे. खरे तर या रस्त्याचे विस्तारीकरण झालेले नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाची उदासीनता दिसून येते. आधीच रस्ता अरुंद असून, त्यातही डांबर निघाल्याने ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याला डांबराचा काही ठिकाणी मुलामा लावण्यात आल्याने तोही निघाला आहे. त्यामुळे दुचाकी घसरून अपघातही घडले आहेत. अनेकजण जखमीही झाले आहेत. मात्र या रस्त्याच्या पुनर्बांधणीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष दिसून येते. मात्र याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.

वाहनधारकांची कसरत- गुरढा ते मेंगापूरपर्यंतच्या रस्त्याची अवस्था फारशी चांगली नाही. वारंवार सांगूनही सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ता बांधकामाकडे दुर्लक्ष का करीत आहेत, हे एक न समजणारे कोडे आहे. वाहनधारकांचा जीव एवढा स्वस्त झाला की काय, असे आता वाटू लागले आहेत. अन्य रस्त्यांची अवस्था चांगली असताना फक्त याच रस्त्याकडे का दुर्लक्ष केले जात आहे, असाही सवाल ग्रामस्थ विचारत आहे. या मार्गाने मोठी रहदारी असताना याचे त्वरित बांधकाम होणे अत्यंत गरजेचे आहे; परंतु तसे होताना दिसून येत नाही. एखादवेळी मोठा अपघात घडल्यावर प्रशासन जागे होणार काय, असे वाटत आहे.

 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग