शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फुटपाथ विक्रेत्यांवरील अन्याय खपवून घेणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:08 IST

मतदान यंत्राच्या सुरक्षेच्या कारणावरुन शास्त्री विद्यालय परिसरातील दुकाने हटविण्यात आली होती. त्याठिकाणी विक्रेत्यांनी पुर्ववत दुकाने थाटण्याचा प्रयत्न केला असता त्यांना प्रशासनाने मज्जाव केला. गोरगरीबांचा व्यवसाय उध्दवस्त झाल्याने शिवसेनेने याबाबत आक्रमक भुमिका घेत नगर परिषद, वीज वितरण कंपनी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले. फुटपाथ विक्रेत्यांवर होणारा अन्याय खपवून घेणार नाही, अशा इशारा देण्यात आला.

ठळक मुद्देशिवसेनेचा पवित्रा : नगर परिषद, वीज वितरण व सीईओंना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मतदान यंत्राच्या सुरक्षेच्या कारणावरुन शास्त्री विद्यालय परिसरातील दुकाने हटविण्यात आली होती. त्याठिकाणी विक्रेत्यांनी पुर्ववत दुकाने थाटण्याचा प्रयत्न केला असता त्यांना प्रशासनाने मज्जाव केला. गोरगरीबांचा व्यवसाय उध्दवस्त झाल्याने शिवसेनेने याबाबत आक्रमक भुमिका घेत नगर परिषद, वीज वितरण कंपनी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले. फुटपाथ विक्रेत्यांवर होणारा अन्याय खपवून घेणार नाही, अशा इशारा देण्यात आला.लोकसभा निवडणुकीतील मतदान यंत्राच्या दृष्टीने शास्त्री विद्यालय परिसरातील दुकाने हटविण्यात आली. ती दुकाने पुर्ववत थाटण्याचा प्रयत्न करण्यात आला असताना त्यांना मनाई करण्यात आली. विक्रेत्यांना देण्यात आलेले वीज मिटरही काढण्याचा प्रकार सुरु झाला. ही माहिती माजी आमदार भोंडेकर यांना मिळताच त्यांनी नगर परिषदेमध्ये धडक दिली. नगराध्यक्ष तथा नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे यांच्याशी चर्चा केली. विक्रेत्यांना तात्काळ कायमस्वरुपी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. अखेर फुटपाथ विक्रेत्यांचे बायोमॅट्रीकद्वारे नोंदणी करुन पर्यायी जागा देण्यास नगर परिषद तयार झाले. त्यानंतर जिल्हा परिषद सीईओंना निवेदन देण्यात आले. त्यांनी अतिक्रमण हटविण्याची कारवाई स्थगीत करण्याचे आश्वासन दिले. तसेच वीज मिटर काढण्याची कारवाई थांबविण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, शिवसेना फुटपाथ सेना जिल्हाध्यक्ष आखीर बेग मिर्झा, जयराम ठोसरे, रमेख धुर्वे, सतिश तुरकर, दिनेश गजभिये, शैलेश खरोले, कृष्णा ठोसरे, मंगेश मुरकुटे, मोहीन शेख, विष्णु कुंभलकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.