शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

चिचाळ अ‍ॅलोपेथिक दवाखाना डॉक्टरविना आजारी

By admin | Updated: January 15, 2015 22:47 IST

स्थानिक अ‍ॅलोपॅथिक दवाखान्यातील कर्मचाऱ्यांची नोकरी प्राथमिक आरोग्य केंद्र कोंढा येथे लावण्यात येत असल्याने शिपाई दवाखाना उघडून बसतो. डॉक्टरविना दवाखाना आजारी पडला आहे.

प्रकाश हातेल - चिचाळस्थानिक अ‍ॅलोपॅथिक दवाखान्यातील कर्मचाऱ्यांची नोकरी प्राथमिक आरोग्य केंद्र कोंढा येथे लावण्यात येत असल्याने शिपाई दवाखाना उघडून बसतो. डॉक्टरविना दवाखाना आजारी पडला आहे. दवाखाना परिचराच्या भरवश्यावर असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. नाहीलाजास्तव रुग्णांना झोलाछाप डॉक्टर कडून इलाज करावा लागत आहे. येथील लोकसंख्येचा विचार लक्षात घेता येथे आयुर्वेदिक दवाखान्याची स्थापना झाली. कालांतराने लोकसंख्येचा विचार लक्षात घेता आयुर्वेदिक दवाखान्याचे रूपांतर आॅग्ल दवाखान्यात केले. मोळकडीस आलेल्या ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये वास्तव्यास असलेल्या दवाखान्याला भव्य इमारत बांधून दिली. दवाखान्याच्या स्थानांतराबरोबर आॅग्ल दवाखान्याचेही पदोन्नती होवून अ‍ॅलोपॅथिक दवाखान्यात रूपांतर झाले. लोकार्पण सोहळा पार पडला.अ‍ॅलोपॅथिक दवाखान्याला भव्य दिव्य इमारत आहे. प्रसुतीगृह, वैद्यकीय तपासणी कक्ष औषधी वितरण कक्ष आदी दवाखान्यात सुव्यवस्थीत पुर्तता शासनाने केली आहे. प्राथमिक उपकेंद्राची इमारत जीर्ण झाल्याने भिंतींना तडे गेले. केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. प्राथमिक उपकेंद्राला बांधकामाला शासनाने मंजूरी प्रदान केली आहे. प्रसुतीसाठी महिलांची पायपीट होत आहे. त्यांना कोंढा अड्याळ येथे हलवावे लागत आहे. चिचाळ अ‍ॅलोपॅथिक दवाखान्याला मोठी सुसज्ज इमारत आहे. येथे प्रसुतीगृहाची वेगळी व्यवस्थाही केली आहे. दवाखान्याला संपूर्ण कर्मचारी मिळाले आहे. मात्र येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची सेवा कोंढा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आठवड्यातून तीन वेळा लावण्यात येते. प्राथमिक आरोग्य केंद्र कोंढा येथे शिबिर असल्यास त्या दवाखान्याला कुलूप ठोकूण हजेरी लावावी लागते. तर दवाखान्यात कर्मचारीच नाही तर दवाखान्याचा उपयोग काय, असा सवाल आहे.