शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

शटल रेल्वे; जनभावनेचा आदर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 05:01 IST

भंडारा शहरवासीयांसाठी अत्यंत ज्वलंत विषय असलेला शटल रेल्वेबाबतच्या निर्णयावर सर्वजण उत्सुक आहेत. मात्र जुना आदेश समोर करीत भंडारा रोड पर्यंतच्या रेल्वे लाईन काढण्याचे कार्य सुरू आहे. काम सुरू होताच जनभावना उफाळून आले. त्यामुळे रेल्वे लाईनच्या नवीनीकरणाची योजना बनत नाही, तोपर्यंत रेल्वे लाईन यथास्थिती ठेवण्यात यावी, या आशयाचा प्रस्ताव सर्वदलीय बैठकीत एकमताने पारित करण्यात आला.

ठळक मुद्देभंडारा येथे सर्वदलीय बैठक : तीव्र आंदोलनाचा इशारा, रेल्वे रुळ उखडल्याने तीव्र संताप

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा शहर ते भंडारा रोड (वरठी) पर्यंत विस्तारित असलेल्या रेल्वे लाईन काढण्याचे काम थांबविण्यात यावे. तसेच शहरातील शटल रेल्वेच्या प्रस्ताव शासनाकडे सादर करून जनभावनेचा आदर करावा, अशी मागणी सर्वदलीय समितीच्या बैठकीत एकमताने करण्यात आलीभंडारा शहरवासीयांसाठी अत्यंत ज्वलंत विषय असलेला शटल रेल्वेबाबतच्या निर्णयावर सर्वजण उत्सुक आहेत. मात्र जुना आदेश समोर करीत भंडारा रोड पर्यंतच्या रेल्वे लाईन काढण्याचे कार्य सुरू आहे. काम सुरू होताच जनभावना उफाळून आले. त्यामुळे रेल्वे लाईनच्या नवीनीकरणाची योजना बनत नाही, तोपर्यंत रेल्वे लाईन यथास्थिती ठेवण्यात यावी, या आशयाचा प्रस्ताव सर्वदलीय बैठकीत एकमताने पारित करण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार मधुकर कुकडे होते. याप्रसंगी खासदार तथा नगराध्यक्ष सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे, भंडारा रेल्वे समितीचे अध्यक्ष प्रेमराज मोहोकर, सचिव रमेश सुपारे, ड्रामा संघटनेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.रेलयात्री समितीच्या बैठकीत समितीच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सर्वच पक्षाचे तसेच सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते. या बैठकीत सामूहिक मागणी करण्यात आली की, रेल्वे लाईन दुरवस्थेत आहे, परिणामी त्या रुळावरून रेल्वे धावणे अशक्य आहे. परंतु सदर रेल्वेलाईन काढून त्या ठिकाणी वृक्षारोपण करणेही उचित नाही, असे झाल्यास भविष्यात रेल्वे विकासाची संभावना शून्य व मोडीत काढली जाईल. यावेळी रेल्वे समितीचे सचिव रमेश सुपारे यांनी राजीव गांधी चौक येथून शटल ट्रेन व रॅक पॉर्इंटची शक्यता, यादृष्टीने तीन वेळा तांत्रिक तपासणी करण्यात आल्याचे सांगितले. परंतु राजकीय इच्छाशक्तीअभावी काम होऊ शकले नाही. ड्रामा रेल्वे संघटनेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल म्हणाले, भंडारा शहरातून एकदा रेल्वे लाईन काढणे म्हणजे शटल रेल्वेबाबत उदासीनता दाखविणे आहे. आमदार कारेमोरे म्हणाले, जनतेला विश्वासात न घेता रेल्वे लाईन काढणे चुकीचे आहे. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष प्रेमराज मोहोकर, विनोद भोयर, प्रवीण उदापुरे यांनीही विचार व्यक्त केले. आमदार भोंडेकर यांनी कार्यकर्त्यांसह रेल्वे लाईन काढण्याचे काम थांबवले होते. यासंदर्भात जनतेत तीव्र आक्रोश आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने जनभावना लक्षात घ्यावी, असे एकमताने ठरविण्यात आले. रेल्वे लाईनमुळे भविष्यात विकासाची अपेक्षा असून पुढची पिढी आपल्याला क्षमा करणार नाही असेही मत यावेळी व्यक्त करण्यात आले.खा. मेंढे म्हणाले, आपण जनभावनासोबत असून यासंबंधीची माहिती रेल्वेमंत्र्यांना पत्राद्वारे अवगत करण्यात येईल. तसेच सर्वदलीय शिष्टमंडळासोबत रेल्वे मंत्रालय व अधिकाऱ्यांना भेटण्याचीही यावेळी ठरविण्यात आले. जवाहरनगर ते वरठी रेल्वे लाईन काढण्याचे काम थांबविण्यासाठी सर्वदलीय रेल विकास मंचचे अध्यक्ष म्हणून माजी खासदार मधुकर कुकडे याची सर्वसंमतीने अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच संसद व विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करावा, अशी आग्रही भूमिकाही यावेळी व्यक्त करण्यात आली.बैठकीत वरीयलदास खानवानी, सुरेश फुलसुंगे, बाबा बाच्छील, चंद्रकांत शहारे, विकास मदनकर, संजय मते, बबन मेश्राम, हेमंत चंदावसकर, उमराव सेलोकर, संतोष राजगिरे, रोशन येरणे, अजय मेश्राम, सुरेश कोटगले, प्रतीक तांबोळी, मयूर बिसने, राजेंद्र उके, नितीन धकाते, जैकी रावलानी, भगवान झंझाड, देविदास लांजेवार, लोकेश खोब्रागडे, विनोद भुरे, मनीष शिरसागर, अशोक वघरे, भाऊराव बन्सोड, हेमंत महाकाळकर आदी उपस्थित होते.समिती पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चासर्वदलीय बैठकीनंतर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्याशी भेट घेत यासंदर्भात चर्चा केली. चर्चेत रेल्वेबाबत भंडारा जिल्ह्यासह शहरवासीयांची जनभावना तीव्र आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रेल्वे लाईन काढण्याचे काम तत्काळ थांबविण्याची मागणीही रेल्वे समितीच्या वतीने याप्रसंगी जिल्हाधिकाºयांना करण्यात आली.

टॅग्स :railwayरेल्वे