शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
3
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
4
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
5
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
7
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
8
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
9
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
10
तुमच्या गृहकर्जाचा हप्ता ४००० रुपयांनी होईल स्वस्त; बँक बदला आणि लाखो रुपये वाचवा! ही आहे पद्धत
11
"मी कितीही स्पष्टीकरण दिलं तरी...", ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चनने सोडलं मौन
12
ढगफुटी झाली आणि पूर आला; गाडी नदीत अडकता ड्रायव्हर चढला टपावर, पुढे काय झालं?
13
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
14
Ashadh Ritual 2025: आषाढात लेकीला माहेरी बोलावण्याची पूर्वापार प्रथा, केला जातो 'असा' कौतुक सोहळा!
15
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
16
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
17
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
18
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
19
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
20
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार

भंगार बसचा प्रवाशांना बसला फटका

By admin | Updated: August 27, 2015 00:53 IST

आगाराची लेंडेझरी-तुमसर एस.टी. बसमध्ये सुरुवातीला तांत्रिक बिघाड झाल्याने बस अर्धा तास उशिरा आली.

विद्यार्थ्यांना शाळेला मारावी लागली बुट्टी : एसटी आगार लक्ष देणार काय?तुमसर : आगाराची लेंडेझरी-तुमसर एस.टी. बसमध्ये सुरुवातीला तांत्रिक बिघाड झाल्याने बस अर्धा तास उशिरा आली. दरम्यान तुमसरकडे येत असताना मिटेवानीजवळ टायर पंक्चर झाल्याने व दुसऱ्या बसेसची सुविधा नसल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांना दोन तास रस्त्यावर ताळकळत उभे राहावे लागले. हा प्रकार बुधवारला सकाळी १०.५० वाजताच्या सुमारास घडला.तुमसर आगारातील बहुतांश बसेस भंगारात निघाल्यागत जमा आहेत. त्या बसेसना रस्त्यावर चालविल्या जात असून अनेक अपघात घडल्याच्या घटना ताज्या आहेत. मात्र अजूनपर्यंत आगारप्रमुखांनी त्याची साधी दखलही घेतली नसल्याचे समजते. मात्र अशा घटनेमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. याची प्रचिती आज घडलेल्या घटनेवरुन दिसून आली. तुमसर आगाराची एस.टी. बस एम.एच. ४०-८११० तुमसर-लेंडेझरी ही बस तुमसर आगारातून सकाळी ८ वाजताच्या सुमारास निघाली असता लेंडेझरी या जंगलव्याप्त आदिवासी बहुल गावात जावून थांबली. ती थांबलीच राहिली. तांत्रिक बिघाडामुळे अर्धा पाऊण तास चालकाने स्वत:चे डोके चालवून कशीबशी सुरु केली. तालुक्यातील लेंडेझरी, आलेसूर, चिखली, देवनारा, कुरमुडा, डोंगरी बु., पवनारखारी, गोबरवाही या आदिवासी गावातील प्रवाशी तसेच शिक्षणाकरिता येणाऱ्या विद्यार्थ्यांना ही बस सोयीचे होत असल्यामुळे या बसमध्ये चढले. मात्र मिटेवानी शेतशिवाराजवळ येताच मागचे टायर पंक्चर झाले. एस.टी. बसेसमध्ये बिघाड झाल्यास त्या बसचे प्रवासी दुसऱ्या बसमध्ये स्थालांतरीत करतात. मात्र नाकाडोंगरी तुमसर मार्गावर खुपच कमी बसगाड्या धावत असल्यामुळे प्रवाशी दोन तास थांबूनही एकही गाडी आली नाही किंवा आगारातील वर्कशॉपचे कर्मचारी न आल्याने चालकाला स्व:त टायर बदलावे लागले. परिणामी सकाळी १०.३० वाजता तुमसर पोहचणारी लेंडेझरी तुमसर बस दुपारी १ वाजता पोहचल्याने शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनींना नाईलाजास्तव शाळेला दांडी मारावी लागली. तसेच त्रास त्यांना सहन करावा लागला आहे. त्यामुळे आगार प्रमुखांनी जातीने लक्ष पुरवून या बसेसच्या समस्या निकाली काढावा अशी प्रवाशांनी मागणी केली. (शहर प्रतिनिधी)