शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

श्रमदान-लोकवर्गणीतून विद्यार्थ्यांनी फुलवली बाग

By admin | Updated: April 27, 2015 00:15 IST

विद्यार्थी शालेय जीवनाचा आरसा आहे. लहानपणापासून जिद्द व चिकाटीने कोणतेही उपक्रम ..

ताडगाव शाळेचा उपक्रम : विविध उपक्रमविलास बन्सोड उसर्राविद्यार्थी शालेय जीवनाचा आरसा आहे. लहानपणापासून जिद्द व चिकाटीने कोणतेही उपक्रम विद्यार्थ्यांनी राबविल्यास त्यांच्यावर निश्चितच स्तुतिसुमनांचा वर्षाव होऊ लागतो.असाच एक प्रकार मोहाडी तालुक्यातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा ताडगाव येथील शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींबाबत घडला. या विद्यार्थ्यांनी शाळेतच श्रमदान व लोकवर्गणीतून बाग फुलवली असून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. जेमतेम १७५ विद्यार्थी या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेत आहेत. शाळेचे मुख्याध्यापक दुर्गादास भड यांच्या नेतृत्वाखाली या विद्यार्थ्यांनी सन २०१३-२०१४ या वर्षात श्रमदान व लोकवर्गणीतून शाळेच्या आवारात बाग लावण्याचे ठरविले.तेव्हाच विद्यार्थ्यांनी बगिचाच्या कामाला सुरुवात केली. यात रोज विद्यार्थी श्रमदान करीत असून बगिचा परिसरातून गवत, कचरा नियमित काढतात. शिवाय बगिचातल्या झाडासाठी विद्यार्थ्यांनी लोकवर्गणी गोळा करुन झाडे लावली. या झाडांना पाणीसुध्दा रोज नियमितरीत्या दिले जाते. सध्या ही बाग हिरवीगार झाली असून बहरली आहे.जिल्हा परिषद ताडगाव या शाळेत विविध उपक्रम लोकवर्गणीतून राबविली जात आहे. त्यात शिक्षक-पालक व नागरिकांकडून मदत मिळत असते. शाळेला खेळण्याच्या दृष्टीने जागा नव्हती अशावेळी नागरिकांच्या लोकवर्गणीतून १ लक्ष ४२ हजार रुपयांची विद्यार्थ्यांना खेळण्याच्या दृष्टीतून जागा घेण्यात आली. यात तत्कालीन शाळा उत्पादन समितीचे अध्यक्ष राजू धांडे, विजय राघोर्ते, सरपंच बिरज वनवे, उपसरपंच अल्का नागलवाडे, रमेश हलमारे, मुख्याध्यापक डी. जी. भड, सहायक शिक्षक के. एम. राणे, एन. टी. गायधने, आर. सी. मेश्राम, पी. के. शेंडे, पी. आर. गिरीपुंजे, डी. पी. भांगे आदीनी मोलाचे सहकार्य केले.याशिवाय लोकवर्गणीतून ३४ हजार रुपयांची नळयोजना, ३० हजार रुपयांची ध्वनिक्षेप असे विविध उपक्रम लोकवर्गणीतून करण्यात आले आहे.श्रमदान व लोकवर्गणीतून विद्यार्थ्यांनी सुरु केलेला हा बगीचा म्हणजे विद्यार्थ्यांनी पत्करलेला उत्तम मार्ग आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना श्रमदान व लोकवर्गणीचे महत्व समजू लागले आहे.- दुर्गादास भड, मुख्याध्यापक जि.प. शाळा ताडगाव