शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या कार्यालयात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 00:25 IST

वर्षभरापूर्वी लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा गढ भेदून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजय संपादन केला होता. मात्र हा विजय आजच्या निवडणुकीत कायम राखता आला नाही. गुरूवारी सकाळी मतमोजणी सुरूवात झाल्यानंतर व परिणाम बाहेर येताच राष्ट्रवादी काँग्रेससह मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांचे चेहरे कोमेजलेले दिसले.

ठळक मुद्देजनतेचा कौल मान्य : निकालानंतर कार्यकर्त्यांचे हिरमुसले चेहरे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वर्षभरापूर्वी लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा गढ भेदून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजय संपादन केला होता. मात्र हा विजय आजच्या निवडणुकीत कायम राखता आला नाही. गुरूवारी सकाळी मतमोजणी सुरूवात झाल्यानंतर व परिणाम बाहेर येताच राष्ट्रवादी काँग्रेससह मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांचे चेहरे कोमेजलेले दिसले. त्यांच्यात निरूत्साह दिसून आला.भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांना प्रत्येक फेरीनिहाय मतांचा आकडा राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्यापेक्षा जास्त वाढत होता. परिणामी काही फेऱ्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या मतमोजणी केंद्रातून बाहेर निघणे पसंत केले. दुपारी १२ वाजतापर्यंत दोन्ही उभयपक्षांमधील उमेदवारांच्या मतांचे अंतर वाढतच गेले. एकीकडे आनंदोत्सव तर दुसरीकडे हिरमुसलेले चेहरे दिसून आले. शहरातील साई मंदिर मार्गावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. दुपारी २ वाजतानंतर कार्यालयात एक दोन व्यक्तींशिवाय कुणीही नव्हते. विशेष म्हणजे निवडणूक कालावधीत पक्षाच्या कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्या यांनी मांदियाळी असायची. मात्र गुरूवारी कार्यकर्त्यांच्या अपेक्षेप्रमाणे निकाल हाती न आल्याने त्यांच्यात नाराजी दिसून आली.भाजपने २०१४ सारखीच पुन्हा पुनरावृत्ती केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह त्यांच्या मित्रपक्षांच्या गोट्यातही असंतोष व हिरमुसलेपणा जाणवला. जिल्हा कार्यालयात असलेला शुकशुकाट पराभवाची चुणूक दाखवित होता.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तथा राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांचे भंडारा-गोंदिया जिल्ह्यात प्राबल्य मानले जाते. स्वत: खासदार पटेल निवडणुकीत उभे नसले तरी उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या रूपाने खासदार पटेल यांचे अस्तित्वही पणाला लागले होते. यात कार्यकर्त्यांनीही जोमाने प्रचाराला सुरूवात करून शेवटपर्यंत प्रचार कार्यात स्वत:ला झोकून दिले होते. आजच्या निकालाने भाजप गोटात खुशी तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या चेहºयावर पराभवाचे दु:ख स्पष्ट दिसून आले.कार्यकर्त्यांमध्ये नाराजीलोकसभा २०१८ च्या पोटनिवडणुकीत राकाँने मुसंडी मारली होती. मधुकर कुकडे हे विजयी झाले होते. यावेळीही विजयाची पुनरावृत्ती होईल, असे वाटत होते. मात्र तसे झाले नाही. परिणामी प्रचारानंतर विजयाचे फळ चाखायला न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून आली. 'कही खुशी कही गम'चा माहोलही यावेळी कार्यकर्त्यांच्या चेहºयावरून अनुभवयास आला. पराभवाचे चिंतन करण्याची गरज असल्याचा सूर यावेळी ऐकावयास मिळाला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल