शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘श्रीराम रंगी रंगली भंडारानगरी’

By admin | Updated: April 5, 2017 00:15 IST

हिंदूचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव आज जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

भंडारा : हिंदूचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव आज जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आकर्षक रोषणाई, ढोलताशांचा लयबद्ध गजर, देखावे आणि शोभायात्रा पाहण्यासाठी लाखोंचा उसळलेला जनसमुदाय हे या शोभायात्रेचे विशेष आकर्षण होते. एकंदरीत ‘श्रीराम रंगी रंगली भंडारानगरी’ असे वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी दुपारी १२ वाजता श्री बहिरंगेश्वर देवस्थान परिसरात असलेल्या श्रीराम मंदिरात श्रीरामजन्मोत्सव सोहळा पार पडला. यापूर्वी भजन, किर्तन रामजन्म कार्यक्रम, आरती व प्रसाद वितरीत करण्यात आला. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास सजविलेल्या आकर्षक रथातून प्रभू रामचंद्र, माता सीता व प्रभू लक्ष्मण यांच्या मूर्र्तींची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत विविध मंडळाचे देखावे, झाकी साकरण्यात आली होती.सायंकाळच्या सुमारास श्रीराम शोभायात्रा समितीच्यावतीने श्री बहिरंगेश्वर देवस्थानातून अतिथींच्या हस्ते पूजन करून शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी आ. अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, राष्ट्रवादीचे प्रदेश महासचिव धनंजय दलाल, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, उपाध्यक्ष रूबी चढ्ढा, उद्योगपती केशवराव निर्वाण, अर्बन बँकेचे अध्यक्ष महेश जैन, शोभायात्रा समितीचे अध्यक्ष संजय कुंभलकर, नगरसेवक चंद्रशेखर रोकडे, नितीन धकाते, मंगेश वंजारी, नितीन दुरगकर, विकास मदनकर, सतीश सार्वे, सत्तार खान, संजय मते, डॉ. जगदिश निंबार्ते, रिंकु शर्मा, पंडित चेपे, यासह शेकडो भाविक उपस्थित होते. फटाक्यांची आतषबाजी व ढोलताशांचा गजर वाखाणण्याजोगा होता. तरूणांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता.याशिवाय बीटीबी सब्जी भाजी असोसिएशनचे पदाधिकारी, हिंदू रक्षा मंच तथा शेतकऱ्यांच्या सहकार्याने सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक मुख्य शोभायात्रेत सहभागी झाली होती. शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या प्रसिद्ध श्रीराम मंदिरात उद्या बुधवारी दुपारी १२ वाजता रामजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यात सकाळी १० वाजतापासून भजन, किर्तन, रामजन्म सोहळा व प्रसादाचे वितरण करण्यात येईल. (प्रतिनिधी)