शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

श्रीराम जन्मोत्सवाची जय्यत तयारी

By admin | Updated: April 4, 2017 00:29 IST

कोट्यवधी हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे.

आज निघणार शोभायात्रा : अड्याळ येथे घोडायात्रेचे आयोजनभंडारा : कोट्यवधी हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. मंगळवारी दुपारी १२ वाजता श्रीरामजन्मोत्सव सोहळा पार पडणार असून सायंकाळी ५ वाजता श्री बहिरंगेश्वर देवस्थानातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. आकर्षक विद्युत रोषणाई, ढोल-ताशांचा गजर व विविध देखावे या शोभायात्रेचे आकर्षण राहणार आहेत.परंपरेनुसार शहरातील ग्रामदैवत असलेल्या श्री बहिरंगेशवर देवस्थान परिसरातील प्रसिद्ध श्रीराम मंदिरात सकाळी ११ वाजतापासून श्रीराम जन्मोत्सव कार्यक्रम सुरू होईल. दुपारी १२ वाजता जन्मोत्सव, त्यानंतर आरती व प्रसादाचे वितरण होईल. तत्पूर्वी सकाळी ग्रामरक्षक देवता आदिशक्ती शितला माता मंदिरातून सकाळी ७.३० वाजता दुचाकी रॅली काढण्यात येईल. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास श्रीराम शोभायात्रा समितीच्यावतीने श्री बहिरंगेश्वर देवस्थानातून अतिथींच्या हस्ते पूजन करून शोभायात्रेला प्रारंभ करण्यात येईल. शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या श्रीराम मंदिरात दुपारी १२ वाजता रामजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय बीटीबी सब्जी भाजी असोसिएशनचे पदाधिकारी, हिंदू रक्षा मंच तथा शेतकऱ्यांच्या सहकार्याने सायंकाळी मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक मुख्य शोभायात्रेत जलाराम चौकात येऊन सम्मिलित होईल. यात ४० कलावंतांचा सहभाग असलेला ढोल-ताशांचा पथक, गडचिरोली जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले आदिवासी नृत्य, परमात्मा एक सेवक संमेलनाची झाकी, तथा कलाकुसर असलेला मध्यप्रदेशातील रथ हे या मिरवणुकीचे आकर्षण राहणार आहे. (प्रतिनिधी)अड्याळ : एकता काय व कशी असते, त्यात भक्तीचा सुगंध जर अनुभवायचे झाल्यास अड्याळ येथील जागृत हनूमान मंदिर! श्रध्दा विश्वास यामुळे या मंदिरात यात्रेदरम्यान देशातील कानाकोपऱ्यातून तसेच विदेशातील भक्तमंडळी या मंदिराची पवित्रता अनुभवाला आजही येताना दिसतात. आध्यात्मिक अनुभूती व शांतीसाठी प्रत्येकाला कुठेणा कुठे जात असतो. या यात्रेदरम्यान गुढीपाडव्याच्या पहिल्या दिवसापासूनच हुमंत मंदिरात टाळ मृदुंगाचा गजर होतो. ढोलताशाच्या नादाने गाव दुमदुमून जातो. देवी-देवतांच्या नावाचा जयघोष सुरु होतो. चव्हाट्यावरचा शुकशुकाट मानसांनी गजबजून जातो. सर्वधर्मा समभावाचा संदेश देत हिंदू, मुस्लीम, बौध्द, शीख या भिन्न धर्माच्या पंथाच्या जातीचा लोकांना एकाच धाग्यात गुंफून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक ठरलेले भंडारा जिल्ह्यातील अड्याळ येथील घोडायात्रा, मनोकामना ज्योती कलश, श्रीरामजन्मोत्सव, श्रीमद्भागवत कथा, हनुमान जंयती आणि सर्वधर्म सामुहिक विवाह सोहळा लोकांनी लोकांकरिता उभारलेली लोकचळवळ ठरली आहे. यामुळे या उत्सवानिमित्त गावातील गल्लोगल्लीत भक्तीभावाचा सुगंध दरवळतांना दिसतो.हनुमंताचे अड्याळ म्हणून संपूर्ण विदर्भात प्रसिध्द असलेल्या २० हजार लोकसंख्येच्या या तिर्थस्थळी गावता चार एप्रिल ते चैत्रपौर्णिमाच्या दिवशीपर्यंत म्हणजे ११ एप्रिल या काळात आगळे वेगळे चैतन्य राहणार आहेत. इंकापासून सर्वांपर्यंत प्रत्येक जण भौतीक अहंकाराची धूळ बाहेर काढून स्वयंसेवक यावृत्तीने कार्य करणार आहे. श्रीरामनवमी शोभायात्रा जन्मोत्सव यावेळी कधी न पाहिला असा देखावा राहणार आहे. ऐतिहासिक घोडायात्रा, संगीतमय, श्रीमदभागवत सप्ताह, सर्वधर्म सामुहिक विवाह सोहळा आहे. जिल्ह्यातील ४० ते ५० हजार लोक भारावलेल्या उत्साह, आनंदाच्या अवस्थेत राष्ट्रीय एकात्मतेचा छताखाली एकत्र येणार आहेत. यात्रेदरम्यान येणाऱ्या हजारो लोकांना मनोरंजन व्हावे म्हणून मिना बाजार, सर्कस जादूचे प्रयोगाचे विविध प्रकारचे दुकाने सुध्दा थाटली गेली आहेत. (वार्ताहर)