शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या अल्प फेऱ्या, प्रतिसाद मात्र उदंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 05:00 IST

शुक्रवारी भंडारा जिल्ह्यातून १४ बसेस धावल्या. त्यात भंडारा आगाराच्या ११ आणि साकोली आगाराच्या तीन बसेसचा समावेश होता. भंडारा आगाराच्या ११ बसेसने दिवसभरात ४२ फेऱ्या करून १९५० प्रवाशांना आपल्या नियोजितस्थळी पोहोचविले. यातून महामंडळाला एक लाख ३० हजार रुपयांचे उत्पन्न झाले. साकोली आगाराच्या तीन बसेसलाही प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. शनिवारी नऊ बसेस धावल्या असून त्यांच्या जवळपास ३६ फेऱ्या झाल्याची माहिती देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी संपावर ठाम असले तरी भंडारा विभागातून अल्प फेऱ्या धावत आहेत. या बसेसला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत असून नागपूर जाणारी बस प्रवाशांनी खचाखच भरून जाते. शुक्रवारी अडीच हजारांवर प्रवाशांनी प्रवास केला असून महामंडळाला सुमारे दीड लाखांचे उत्पन्न झाले.गत ५३ दिवसांपासून एस.टी. महामंडळाचे कर्मचारी संपावर गेले आहेत. एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे ही प्रमुख मागणी घेऊन कर्मचारी संपावर अद्यापही ठाम आहे. निलंबन, बदल्या आणि राेजंदारी कर्मचारी सेवामुक्ती केल्यानंतरही कर्मचारी कामावर यायला तयार नाही. दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेल्या आवाहनानुसार भंडारा विभागातील ४५ कर्मचारी दोन दिवसांत कामावर परतले. कामावर असलेल्या अत्यल्प कर्मचाऱ्यांच्या भरोशावर काही बसफेऱ्या दोन आठवड्यांपासून काढण्याचे नियोजन करण्यात येत आहे. शुक्रवारी भंडारा जिल्ह्यातून १४ बसेस धावल्या. त्यात भंडारा आगाराच्या ११ आणि साकोली आगाराच्या तीन बसेसचा समावेश होता. भंडारा आगाराच्या ११ बसेसने दिवसभरात ४२ फेऱ्या करून १९५० प्रवाशांना आपल्या नियोजितस्थळी पोहोचविले. यातून महामंडळाला एक लाख ३० हजार रुपयांचे उत्पन्न झाले. साकोली आगाराच्या तीन बसेसलाही प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. शनिवारी नऊ बसेस धावल्या असून त्यांच्या जवळपास ३६ फेऱ्या झाल्याची माहिती देण्यात आली.गत ५३ दिवसापासून संप सुरू असल्याने भंडारा विभागातील बससेवा जवळपास ठप्प झाली आहे. मात्र अशा परिस्थितीतही महामंडळाचे अधिकारी काही फेऱ्यांचे नियोजन करीत आहेत. भंडारा-नागपूर, साकोली, गोंदिया, पवनी अशा बसफेऱ्या निघत आहेत. खासगी वाहन धारकांकडून लूट होत असल्याने अनेक प्रवासी प्रथम बसस्थानकावर येवून बस कितीवेळात आहे याची चौकशी करतात. बस असेल तर सर्वप्रथम एसटी बसलाच प्राधान्य देतात. संपकाळात भंडारा बसस्थानका समोर अवैध प्रवासी वाहतुकदारांनी ठिय्या मांडला आहे. रस्त्याच्या मधोमध आपली मोठाली वाहने उभे करून प्रवाशांना जोर जोराने ओरडून बोलावित आहेत. 

नऊ जणांना कारणे दाखवा नोटीस

- विविध आवाहन केल्यानंतरही एसटीचे कर्मचारी कामावर यायला तयार नाही. अशा स्थितीत महामंडळाने आता कडक धोरण स्विकारले आहे. शनिवारी तुमसर आगारातील नऊ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आता हे कर्मचारी कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. 

संपात असलेल्या परंतु महामंडळाने कोणतीही कारवाई केली नाही. असे कर्मचारी कामावर येवू शकतात. कामावर आल्यास त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. कर्मचाऱ्यांनी आपल्यावर कारवाई होईल, असा गैरसमज करू नये.-चंद्रकांत वडसकर, विभागीय वाहतूक अधिकारी. 

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप