शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! रेती तस्करांनी पोखरले बावनथडी नदीपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:37 IST

तुमसर : आंतरराज्य बावनथडी नदीवरील आठ रेती घाट रेती तस्करांचे पोखरणे सुरू आहे. नदीपात्राच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची, ...

तुमसर : आंतरराज्य बावनथडी नदीवरील आठ रेती घाट रेती तस्करांचे पोखरणे सुरू आहे. नदीपात्राच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न पडत आहे. लाखोंचा महसूल तर बुडत आहे. सोबतच नदीच्या अस्तित्वाला व पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. वैनगंगा नदीपात्रातील रेती घाटांचीही अशीच स्थिती आहे.

तुमसर तालुक्यात बावनथडी नदीचे पात्र सुमारे तीस ते पस्तीस किलोमीटर लांब असून, मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा आहे. यात चांदमारा, आष्टी, चिखली, देवनारा, लोभी, पाथरी या रेती घाटांचा समावेश आहे. यापैकी राज्य शासनाने एकाही रेती घाटाचा लिलाव दीड वर्षापासून केला नाही. परंतु, राजरोसपणे या रेती घटातून रेतीचा अवैध उपसा सुरू आहे. संघटनात्मक पद्धतीने रेतीची सर्रास चोरी सुरू आहे. यापूर्वी या रेती घाटांचा लाखो रुपयांत रेती घाट लिलाव करण्यात आले होते.

मध्यप्रदेशातून उगम पावणाऱ्या बावनथडीचे पात्र विस्तीर्ण आहे. या नदीपात्रात उच्च गुणवत्तेची रेती उपलब्ध आहे. बेसुमार रेती उपशामुळे अनेक ठिकाणी झुडपी वनस्पती उगवली आहे. नदीपात्रात सर्वत्र खड्डेच खड्डे दृष्टीस पडतात. मध्यप्रदेश शासनाने या नदीपात्रातील अनेक घटांचे लिलाव केले आहे. महाराष्ट्र शासनाने लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली नाही. परंतु, रेती चोरी मात्र सर्रास सुरू आहे. तालुक्याची सीमा नागपूर जिल्ह्याला लागून आहे. लेंडेझरी मार्गाने थेट हिवरा बाजार, रामटेक येथे हा रस्ता जातो. चोरीची रेती याच मार्गाने वाहतूक सुरू असल्याची माहिती आहे.

बॉक्स

कोतवाल, तलाठ्याकडे संरक्षणाची जबाबदारी

रेती चोरी होऊ नये त्यासाठी रेती घाट संरक्षणाची जबाबदारी स्थानिक कोतवाल व तलाठ्याकडे सोपविण्यात आली आहे. परंतु, कोरोना संक्रमण काळात कोतवाल व तलाठ्यांना विविध कामे करायची आहेत. एका तलाठ्याकडे दोन ते तीन गावांचा प्रभार आहे. त्यातच त्यांना माहिती गोळा करणे, त्याची ऑनलाइन माहिती शासनाला पाठविणे आदी कामे करावी लागतात. त्यामुळे रेती घाटांचे संरक्षण करण्याकरिता त्यांनाही मर्यादा येथे येत आहे.

बाॅक्स

पर्यावरणाची हानी

रेती घाट लिलाव करत असताना खनिकर्म विभाग व महसूल विभाग पर्यावरणाची हानी होणार नाही, या दृष्टिकोनातून अहवाल मागवून त्यानंतर लिलाव करण्यात येतो. नियमानुसार पर्यावरणाची हानी होऊ नये, हा येथे नियम आहे. दुसरीकडे रेती तस्करांचे मात्र येथे राजरोसपणे संपूर्ण नदीपात्र पोखरणे सर्रास सुरूच आहे. यामुळे पर्यावरणाची येथे मोठी हानी होत आहे. बावनथडी नदीवर धरण बांधले असल्याने वर्षातून किमान नऊ महिने ही नदी कोरडी राहते. त्या कारणामुळे रेती तस्करांचे येथे चांगभले होते.