शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
4
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
5
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
6
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
7
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
8
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
9
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
10
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
11
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
12
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
13
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
14
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
15
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
16
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
17
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
18
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
19
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
20
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान

धक्कादायक! भंडारा जिल्ह्यात जादूटोण्याच्या संशयावरुन चौघांची नग्न धिंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 15:21 IST

जादूटोण्याच्या संशयावरुन चौघांची नग्न धिंड काढून बेदम मारहाण करण्याची घटना तुमसर तालुक्यातील राजापूर येथे शनिवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्दे२२ जणांना अटकराजापूरची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जादूटोण्याच्या संशयावरुन चौघांची नग्न धिंड काढून बेदम मारहाण करण्याची घटना तुमसर तालुक्यातील राजापूर येथे शनिवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी गावातील २४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून २२ जणांना अटक करण्यात आली आहे. या घृणास्पद घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून जिल्हा पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधीकारी राजापूर येथे तळ ठोकून आहेत.कचरू फत्तु राऊत (६०), ओमप्रकाश सदाशिव मेश्राम (२७), कुंदन भोजराम गौपाले (४०), मनोहर बळीराम गोटे (७०) अशी पिडीतांची नावे आहेत. गत आठवडाभरापासून गावातील एका महिलेची प्रकृती ठिक नव्हती. औषध उपचार करुनही तिला बरे वाटत नव्हते. दरम्यान तिच्या अंगात येवू लागले. तिने गावातील या चौघांची नावे सांगून त्यांनी जादूटोणा करीत असल्याचे सांगितले. त्यावरुन गत गुरुवारी गावकऱ्यांची बैठक घेण्यात आली. या चौघांना बैठकीला बोलाविण्यात आले. त्यावेळी ओमप्रकाश आणि कचरु बैठकीला उपस्थित होते. त्यांना समजही देण्यात आली. मात्र महिलेच्या अंगात येण्याचा प्रकार थांबला नाही.

एवढ्यातच शनिवारी नागपंचमीच्या दिवशी पुन्हा हा प्रकार सुरु झाला. गावकरी एकत्र आले आणि ओमप्रकाश, कचरु, कुंदन आणि मनोहर याचा चौघांना त्यांच्या घरातून पकडून चौकात आणले. त्यांच्या अंगावरील कपडे काढून रॉकेल ओतून पेटवून देण्यात आले. हातपाय बांधून त्यांची गावातून नग्न धिंड काढण्यात आली. हा प्रकार गावकरी उघड्या डोळ्याने बघत होते. तेवढ्यात गोबरवाही पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांचे पथक गावात पोहोचले. मात्र गावकऱ्यांनी पोलिसांच्या वाहनालाही घेराव घातला. दरम्यान पोलिसांनी या चौघांची गावकऱ्यांच्या तावडीतून सुटका केली. बेदम मारहाणीत चौघेही जखमी झाले असून त्यांना तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी कचरु राऊत यांनी गोबरवाही पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन योगेश चोपकर, देवा चोपकर, रवी राऊत, महेंद्र राऊत, अविनाश मेश्राम, मच्छिंद्र परबते, निरंजन परबते, सुखदेव परबते, राजकुमार घोनाडे, राजेंद्र गुर्जर, प्रतीक मकराम, प्रविण परबते, विशाल मेश्राम, आकाश वघारे, रिची डोंगरे, शिशिर डोंगरे, आशा चोपकर, मनिषा चोपकर, सुनंदा झोडे, शामकला राऊत, जयकला राऊत, विनिता परबते, ओमकला झोडे सर्व रा.राजापूर आणि नौशाद पठाण रा. गोबरवाही यांच्याविरुध्द भादंवि ३०७, ३५३, ३४१, ३२३, ३२४, १४३, १४८, १४९, ५०४ सहकलम २(१) (ख), ७, महाराष्ट्र जादुटोना प्रतिबंध अधिनियम २०१३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यापैकी २२ जणांना पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. लाकडी काठ्या, प्लास्टिक बॉटल, रॉकेल व पेट्रोलच्या रिकाम्या बॉटल, नॉयलॉन दोरी जप्त करण्यात आल्या आहेत.

घटनेची माहिती होताच जिल्हा  पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख गजानन कंकाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या वरिष्ठ पोलीस अधिकारी राजापूर येथे तळ ठोकून आहेत.वेळीच पाऊस आल्याने चौघे बचावलेगावकऱ्यांनी चौघांची नग्न धिंड काढताना बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी जोरदार पाऊस आल्याने हे चौघेही बचावले. गावात हा घृणास्पद प्रकार सुरु असताना चौघांच्या मदतीला कुणीही आले नाही. या घटनेने संपूर्ण राजापूर गावात तणावपुर्ण शांतता आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी