भंडारा : वीज महावितरण कंपनी प्रशिक्षणार्थी असलेल्यांना मानधनात वाढ झाली असली तरी त्यांना वंचित ठेवण्यात येत आहे. याची माहिती मिळताच शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात महावितरण अधिक्षक अभियंता सतिश मेश्राम यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. महावितरणच्या अधिनस्थ प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. मात्र त्यांना देण्यात येत असलेल्या मानधनात तफावत आहे. उर्वरित मानधन देवून महिन्याला देण्यात येणारे मानधन पुर्ण दयावी अशी मागणी त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना अनेकदा केली. मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. याची माहिती प्रशिक्षणार्थ्यांनी भोंडेकर यांना निवेदनातून दिली. यावरुन भोंडेकर हे शिवसैनिकांसह महावितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता सतिश मेश्राम यांच्या कार्यालयात धडकले. यावेळी मेश्राम अनुपस्थित असल्याने उपकार्यकारी अभियंता गेडाम यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी ९ आॅक्टोंबरपासून मानधनात वाढ करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. उर्वरित मानधन येत्या काही दिवसातच देण्याची आश्वासन अधिकाऱ्यानी या शिष्टमंडळाला दिले.यावेळी नरेंद्र भोंडेकर यांच्यासह अनिल गायधने, मुकेश थोटे ललित बोंदरे, गौरीशंकर पंचबुध्दे, देवराज वनवे, अमित मेश्राम, प्रविण कांबळे, श्रीधर हिंगे, गणेश बिलोर, रोशन बडवाईक, सुखराम उके, संदिप बुध्दे, संदिप बांगरे, लोकेश भाजीपाले, सुनिल गभणे, मनोज कटनकर, अश्विन गटनकर, गितेश गोंधुले, राहुल पटले, संदीप सार्वे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
महावितरण कार्यालयावर शिवसैनिकांची निदर्शने
By admin | Updated: October 21, 2015 00:43 IST