शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

भंडारातील अतिक्रमण हटाव मोहिमेविरुद्ध शिवसेनेचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:37 IST

शहरात शुक्रवारपासून पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम सुरु होत असून या मोहिमेच्या विरोधात शिवसेनेने एल्गार पुकारला आहे. व्यावसायिकांना आधी पर्यायी जागा द्या, नंतरच अतिक्रमण हटवा, अशी भूमिका घेतली आहे.

ठळक मुद्देमुंडण आंदोलन : आधी व्यावसायिकांना पर्यायी जागा द्या, नंतर मोहीम राबवा,

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरात शुक्रवारपासून पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम सुरु होत असून या मोहिमेच्या विरोधात शिवसेनेने एल्गार पुकारला आहे. व्यावसायिकांना आधी पर्यायी जागा द्या, नंतरच अतिक्रमण हटवा, अशी भूमिका घेतली आहे. प्रशासन अतिक्रमण हटविण्यावर ठाम राहिल्यास धरणे, मुंंडण आंदोलन आणि लोकप्रतिनिधींच्या प्रतिमांचे दहन करण्याचा इशारा येथे विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिला आहे.भंडारा शहरात बहुतांश रस्त्यावर गोरगरीब आपले व्यवसाय थाटून संसार चालवित आहेत. आता त्यांच्या अतिक्रमणावर बुलडोजर चालविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शुक्रवारपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरु होत आहे. व्यवसायीकांना कोणत्याही नोटीस न देता रिक्षांमध्ये ध्वनीक्षेपक लावून दंवडी पिटली जात आहे. यामुळे व्यवसायीकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे वर्षभरातील ही अतिक्रमण हटविण्याची चवथी कारवाई होय. यापुर्वीही प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. मात्र पंधरा ते वीस दिवसातच जैसे थे स्थिती झाली. अतिक्रमणावर कायम स्वरुपी तोडगा म्हणजे रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांना कायमस्वरुपी जागा देणे होय. मात्र प्रशासन तशा कोणत्याही उपाययोजना न करता थेट गरीबांचे दुकान उद्ध्वस्त करतात. आता या विरुध्द शिवसेनेने एल्गार पुकारला आहे. अतिक्रमण हटाव मोहीमेला विरोध करण्यासाठी शुक्रवारी ७ डिसेंबर रोजी शिवसेनेच्यावतीने लाल बहादुर शास्त्री चौक, महात्मा गांधी चौक, पोस्ट आॅफीस चौक, मुस्लीम लायब्ररी चौक या चार ठिकाणी धरणे देण्यात येणार आहेत. यानंतरही प्रशासनाने योग्य भुमिका घेतली नाही तर १० डिसेंबर रोजी मुंडण आंदोलन करण्यात येईल. तसेच ११ डिसेंबर रोजी निषेध मोर्चा काढू. लोक प्रतिनिधीच्या प्रतिमेचे दहन केले जाईल असे सांगितले. या पत्रपरिषदेला माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, अ‍ॅड. रवी वाढई, सुरेश धुर्वे, संजय रेहपाडे यांच्यासह फुटपाथ शिवसेना संघटनेचे अध्यक्ष अख्तर बेग मिर्झा आदी उपस्थित होते.महिला रुग्णालयाची जागा हडपण्याचा डावजिल्हा महिला रुग्णालयाकरिता टोकण निधीची तरतुद करुनही बांधकामासाठी हेतूपुरस्सर विलंब केला जात आहे. रुग्णलयाची जागा हडपण्याचा डाव असल्याचा आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पत्रकार परिषदेत केला. आपण या रुग्णालयासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. सध्या ४ कोटी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध आहे. पंरतु रुग्णालय बाधकामास चालढकल केली जात आहे. मुळातच रुग्णालयाचे बांधकाम होऊ नये, असा प्रयत्न स्थानिक आमदारांकडून होत असल्याचा आरोप त्यांनी केला. रुग्णालयासाठी आरक्षित जागा एका भाजीमंडीच्या माध्यमातून हडपण्याचा डाव असून बांधकामाबाबत स्थानिक खासदार आणि आमदार उदासीन असल्याचे भोंडेकर यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणShiv Senaशिवसेना