शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पिपरीत शिरले वैनगंगेचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 22:39 IST

वैनगंगा नदीवरील कवलेवाडा मांडवी गावाच्या शेजारी असणाऱ्या धरणात पाणी अडविण्यात आल्याने पिपरी (चुन्ही) गावात पाणी शिरले आहे.

ठळक मुद्देपूल व रस्त्याचे निकृष्ट बांधकाम : चुल्हाड ते पिपरी गावांचा संपर्क तुटला

आॅनलाईन लोकमतचुल्हाड (सिहोरा) : वैनगंगा नदीवरील कवलेवाडा मांडवी गावाच्या शेजारी असणाऱ्या धरणात पाणी अडविण्यात आल्याने पिपरी (चुन्ही) गावात पाणी शिरले आहे. पूल आणि रस्त्याचे बांधकाम निकृष्ट करण्यात आल्याने गावकऱ्यांचा संपर्क तुटला आहे.गोंदिया जिल्ह्यात असणाऱ्या अदानी व धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पांना पाणी पुरवठा करण्यासाठी वैनगंगा नदीवर कवलेवाडा - मांडवी गावाचे शेजारी धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. या धरणात पाणी अडविण्यात आल्याने २५ कि.मी. अंतर पर्यंत नदीपात्रात पाणीच पाणी आहे.सिहोरा परिसरात असणाऱ्या वैनगंगा नदी काठावरील गाव शेजारी असणारे नाले तुडुंब भरले आहे. नाल्याचे पाणी गावाचे दिशेने शिरण्यास सुरुवात झाली आहे. नद्या काठावरील गावात शेतकऱ्यांना शेत शिवारात ये जा करताना त्रास होणार नाही याची दखल घेत तिरोडा उपसा सिंचन योजनेंतर्गत पुलाचे बांधकाम करण्यात आली आहे.पिपरी (चुन्ही) गावाचे वास्तव धरणाचे शेजारी असल्याने या गावात चुल्हाड मार्गाचे नाल्यावर पुल आणि रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु पुल आणि रस्त्याचे बांधकाम निकृष्ट करण्यात आल्याने पाण्याचे पातळीत वाढ झाल्याने पुलावरून पाणी वाहत आहे. रस्ता बुडाला आहे. यामुळे चुल्हाड गावासोबत असणारा गावकºयांचा संपर्क तुटला आहे. बुडीत नाले वरील पुलांची उंची वाढविण्यासाठी पुलांचे बांधकाम मंजूर आहे. पूल बांधकामात निधी खर्चात वारे न्यारे करण्यात आल्याने गावकऱ्यांचे अडचणीत वाढ झाली आहे. नाल्यावरुन प्रवास करताना गावकऱ्यांत भीती निर्माण झाली आहे. नाल्याचे पाणी गावाचे दिशेने येत असल्याने गावकºयांची धाकधुकी वाढली आहे.दरम्यान नदी काठावरील देवरी (देव), सुकळी (नकुल) गावाचे शेतशिवारात पुल व रस्त्याचे बांधकाम करण्यात आली आहेत. सुकळी (नकुल) गावाचे लगत असणाऱ्या नाल्यावरील पुलाचे पिचींग करताना मातीचा उपयोग करण्यात आला आहे पिचींगचे कामात मुरुमाचा उपयोग करण्यात आला नाही.पुलाचे बांधकामावर तीन कोटींचा निधी खर्च करण्यात आला असला तरी रस्त्याचे बांधकामात अल्प मुरुम घालण्यात आले आहे. यामुळे रस्त्याचे मुरुम दिसेनासे झाले आहे. शेतकऱ्यांना या मार्गाने ये जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. बांधकाम करण्यात आलेल्या पुल आणि रस्ते बांधकामात काळेबेरे झाल्याली तक्रार ग्रामपंचायत अंतर्गत तिरोडा उपसा सिंचन योजना विभागाकडे करण्यात आली आहे.गावातील नाल्यावर वाढीव उंची असणारे पुलाचे बांधकाम मंजूर करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात बांधकाम निकृष्ट करण्यात आले आहे. पाण्यात पुलाचे बांधकाम बुडीत असून गावाचे दिशेने पाणी शिरले आहे. चौकशी झाली पाहिजे..-सुखदेव राऊत,उपसरपंच पिपरी (चुन्ही),