शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संसर्गाने मेंढपाळ सापडले अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 17:38 IST

आजही भटक्या समाजातील अनेक कुटुंबे पशुपालनाच्या व्यवसायानिमित्ताने भटकंती करीत आहेत. यासाठी अनेक शेतशिवारात फिरताना जनावरांसह कुटुंबाना अनेकदा जीव धोक्यात घालावा लागतो. यावर्षी असणाऱ्या कोरोना सदृश परिस्थितीमुळे अनेकांकडून मदत मिळत नसल्याने मेंढपाळ व्यवसायीकांवर उपासमार करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देशासनाकडून मदतीची अनेकांना अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादूभार्वामुळे जिल्ह्यातील पशुपालन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी समस्या येत असल्याने हा व्यवसाय अडचणीत आला आहे. शासनाने पशुपालक व्यवसायीकांसह मेंढपाळांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.आजही भटक्या समाजातील अनेक कुटुंबे पशुपालनाच्या व्यवसायानिमित्ताने भटकंती करीत आहेत. यासाठी अनेक शेतशिवारात फिरताना जनावरांसह कुटुंबाना अनेकदा जीव धोक्यात घालावा लागतो. यावर्षी असणाऱ्या कोरोना सदृश परिस्थितीमुळे अनेकांकडून मदत मिळत नसल्याने मेंढपाळ व्यवसायीकांवर उपासमार करण्याची वेळ आली आहे. शासनाकडून भटक्या समाजासाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र कागदपत्राअभावी अनेकांना या योजनेचा लाभ प्रत्यक्षात मिळत नाही.

भंडारा जिल्ह्यातील पवनी, तुमसर, लाखांदूर परिसरात आजही धनगर समाजाचा मुख्य व्यवसाय पशूपालनच आहे. यासाठी शासनाने पंचायत समिती विभागामार्फत शेळी पालनाची योजना सुरु केली. मात्र भटक्या विमुक्तांना या योजनेचा अद्याप लाभ मिळालेला दिसून येत नाही. मेंढपाळाचे खडतर जीवन असून शासनाने मेंढपाळांसह पशूपालन करणाºया गावापासून दूर राहणाºया या व्यवसायीकांना आर्थिक मदत करण्याची गरज आहे.

जिल्ह्यात शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकऱ्यांनी पशुपालनाचा जोडधंदा सुरु केला आहे. आजही शेणखताला चांगली मागणी आहे. अनेकजण शेतात मेंढाना तसेच गायींना बसवितात. मात्र यावर्षी कोरोना संकटामुळे अनेकांनी याकडे पाठ फिरविली आहे. विविध योजनांमधून पशूपालकांना विविध योजना तयार करण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात विविध कागदपत्रांअभावी शासनाच्या योजनांचा पशूपालकांना लाभ मिळत नाही. पशूपालकांना चारा कुटार यासह विविध साहित्य देण्याची गरज आहे.

टॅग्स :Socialसामाजिक