शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

शास्त्री विद्यालयाची ‘ओजल’ जिल्ह्यात अव्वल

By admin | Updated: May 31, 2017 00:34 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दुपारी १ वाजता आॅनलाईनद्वारे बारावीचा निकाल घोषित यात भंडारा जिल्ह्याचा निकाल ९२.९३ इतका लागला.

जिल्ह्याचा निकाल ९२.९३ टक्के : नागपूर विभागात भंडारा प्रथम क्रमांकावर लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दुपारी १ वाजता आॅनलाईनद्वारे बारावीचा निकाल घोषित यात भंडारा जिल्ह्याचा निकाल ९२.९३ इतका लागला. भंडारा येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयाची ओजल धमेंद्र उरकुडकर या विद्यार्थिनीने ९४ टक्के गुण प्राप्त करून जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला. तिला ६५० पैकी ६११ गुण मिळाले आहेत. द्वितीय क्रमांक शहापूर येथील नानाजी जोशी महाविद्यालयाची विद्यार्थिनी भाग्यश्री वाहीले (५९७ गुण) हिने तर तृतीय क्रमांक भंडारा येथील नुतन कन्या शाळेची ऋतिका सुखराम वाघमारे प्राप्त केला. यावर्षीही मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारली आहे. कला शाखेतून नानाजी जोशी विद्यालयाची प्रांजली भालाधरे ही विद्यार्थिनी जिल्ह्यातून पहिली आली असून तिला ८७.२३ टक्के गुण मिळाले आहेत. बारावीची १९ हजार ३९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १८ हजार २७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. श्रेणीनिहाय निकालयावर्षी जिल्ह्यातून १९ हजार ४०६ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी १९ हजार ३९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी १८ हजार २७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ६०५ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी प्राप्त केली. ५,७८० विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ११ हजार ४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ६३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.शाखानिहाय निकालजिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल ९७.६० टक्के, कला शाखेचा निकाल ८९.२१ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९६.०४ टक्के तर एमसीव्हीसी शाखेचा निकाल ९१.४३ टक्के लागला आहे. शाखानिहाय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान शाखेचे ७,३९५ विद्यार्थी, कला शाखेचे ९,०५८, वाणिज्य शाखेचे १,०१९ तर एमसीव्हीसी शाखेचे ५५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. साकोली तालुका अव्वलभंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यातून साकोली तालुका विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याच्या टक्केवारीत आघाडीवर आहे. मोहाडी तालुक्याचा निकाल पिछाडीवर आहे. तालुकानिहात निकालांतर्गत भंडारा तालुक्याची निकालाची टक्केवारी ९४.२३, लाखांदूर ९३.६०, लाखनी ९३.१६, मोहाडी ९०.५२, पवनी ९०.८०, साकोली ९४.७७ तर तुमसर तालुक्याची निकालाची टक्केवारी ९२.६० इतकी आहे. सातही तालुक्यातून मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९१.०७ असून मुलींची टक्केवारी ९४.६६ आहे. तालुकानिहाय उत्तीर्ण विद्यार्थी१८ हजार २७ उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये भंडारा तालुक्यातून ४,८१७ पैकी ४,५३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लाखांदूर तालुक्यातून १,४६९ पैकी १,३७५ विद्यार्थी, लाखनी तालुक्यातून २,५६० पैकी २,३८५ विद्यार्थी, मोहाडी तालुक्यातून २,६८०पैकी २,४२६ विद्यार्थी, पवनी तालुक्यातून २,२८३ पैकी २,०७३ विद्यार्थी, साकोली तालुक्यातून २,४२६ पैकी २,२९९ विद्यार्थी तर तुमसर तालुक्यातून ३,१६४ पैकी २,९३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.