शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
3
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
4
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
7
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
8
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
9
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
10
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
11
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
12
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
13
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
14
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
15
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
16
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
17
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
18
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
19
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
20
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...

‘शेप’ने दीड कोटींनी गंडविले

By admin | Updated: October 14, 2016 03:32 IST

अभिनय अभिरूची कला व बहुउद्देशीय संस्था गडचिरोली अंतर्गत सिहोरा परिसरात सुरू करण्यात..

पोलिसांना निवेदन : एजंटांच्या दारी दिवाळीपूर्वी खातेदारांचा राडा, शेती विक्रीतून खातेदारांची भरपाईचुल्हाड (सिहोरा) : अभिनय अभिरूची कला व बहुउद्देशीय संस्था गडचिरोली अंतर्गत सिहोरा परिसरात सुरू करण्यात आलेल्या शेप महाबचत गट योजनेने खातेदारांन दीड कोटींनी गंडविल्याची तक्रार सिहोरा पोलिसांना देण्यात आली आहे. दिवाळीपुर्वी पैसे परत देण्यासाठी खातेदारांचा एजटांच्या घरी राडा सुरू झाला आहे.सिहोरा परिसरात शेप महाबचत गट योजने अंतर्गत खातेदारांनी अनेक आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडण्यात आले आहे. ग्रामीण भागात जवळील साधणाऱ्या तरूणांना या महाबचत योजनेत संधी उपलब्ध करण्यात आली आहे. सिहोऱ्यात शेप महाबचत गट संस्थेचे कार्यालय आल्यानंतर गावा गावात एजंटांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कार्यालयात याच परिसरातील बेरोजगार तरूणांची नियुक्ती करण्यात आल्याने ग्रामीण भागात बचत गटांचा प्रचार आणि प्रसार झाला आहे. कार्यालय अंतर्गत रोजगारांची संधी उपलब्ध झाल्याने तरूणांनी २ ते ३ लाख रूपयांची गुंतवणुक केली आहे. या शिवाय नित्यनिधी ठेव, बचत तथा दाम दुप्पट योजनेत अनेक खातेदारांनी राशीची गुंतवणुक केली आहे. एकट्या सिहोरा परिसरात राशी गुुंतवणुकीचा आकडा १ कोटी २७ लाख रूपयाचे घरात आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांची गुंतवणुक लक्षात घेता हा आकडा फुगणार आहे. यामुळे कोट्यावधी रूपयाची गुंतवणूक शेप महाबचत गटाने बुडविल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान दिवाळी पर्व सुरू झाल्याने खातेदारांनी कर्मचाऱ्यांना गुंतवणुक केलेल्या राशीची मागणी करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान जबाबदार यंत्रणाच बेपत्ता असल्याने स्थानिक २६ कर्मचाऱ्याची झोपच उडाली आहे. या एजटांनाच खातेदारांनी धारेवर घेण्यास सुरूवात केली आहे. दिवाळीपूर्वी गुंतवणूक करण्यात आलेल्या पैशांची परतफेड करण्यासाठी रोज एजंटाच्या घरी खातेदारांचा राडा सुरू झाला आहे. परिसरात एका एजंटाने स्वत:ची शेती विक्री व गहाण ठेवून खातेदाराचे गुंतवणूक करण्यात आलेले पैसे परत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. परंतु अनेक कार्यरत कर्मचाऱ्याकडे स्वत:ची मालमत्ता विक्री करून पैसे परत करण्याचा उपाय नाही. यामुळे खातेदारांची चिंता वाढली आहे. खातेदारांचा वाढता टेंशन असल्याने अनेक एजंटांनी गावा बाहेर पडवाट शोधल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान सिहोरा स्थित कार्यालयात कार्यरत कर्मचारी व संलग्नीत गुंतवणूकदार तथा खातेदारांनी सिहोरा पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे. संपूर्ण जिल्ह्यात शेपने अनेकांना गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे.रात्र आणि दिवस बिडी बांधण्याचे व्यवसायातून आपले भवितव्य सावरण्यासाठी पैशाची बचत केली. ही राशी शेपमध्ये गुंतवणूक केली. परंतु पै, पै जमा करण्यात आलेली राशी बुडाल्याची माहिती प्राप्त होताच गरीब बिडी कामगारांना हृदयविकारांचा झटका बसल्याची माहिती असून पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी कार्यरत कर्मचारी सुजीत गोंडाने यांनी केली आहे. (वार्ताहर)