शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शंकरपटातून ग्रामीण अर्थव्यवस्थेत होते लाखोंची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 12:39 IST

Bhandara : कृषी संस्कृतीशी जुळली नाळ

लोकमत न्यूज नेटवर्क जेवनाळा : दिवाळी पश्चात शेतीचा हंगाम आटोपल्यानंतर ग्रामीण भागात कृषी संस्कृतीशी नाळ जपलेला शेतकरी बांधवांचा अत्यंत जिव्हाळ्याचा व आनंदाचा खेळ म्हणजेच बैलांचा 'शंकरपट' होय. साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गावोगावी पटांचे आयोजन करण्यात येते. यातून मनोरंजनासोबतच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेत लाखोंची उलाढाल होत असून, अनेकांना रोजगारसुद्धा मिळत असतो.

शंकरपट हा केवळ खेळ नसून ती ग्रामीण भागाची परंपरासुद्धा आहे. बैलगाडी शर्यतीला जवळपास ३०० वर्षांची परंपरा आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जानेवारी महिन्यात शंकरपटांचे आयोजन करण्यात येते डिसेंबर महिना आटोपताच पटाच्या दानी तयार करण्याचे काम केले जाते. जिल्ह्याच्या अनेक गावांमध्ये पूर्वीपासूनच पटाच्या दानींसाठी जागा राखीव ठेवण्यात आलेली आहे. तसेच महिन्याच्या तारखासुद्धा पटासाठी फार पूर्वीपासूनच राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. ज्या गावात पटाचे आयोजन केले जाते त्या गावातील लोकांमध्ये जणू उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळते. गावाशेजारील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांना पट पाहण्यासाठी सुट्टी देण्यात येते. तसेच पटाच्या गावी व परिसरातील घरोघरी पाहुण्यांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. शंकरपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळते. पट कमीतकमी दोन दिवसांचा तर अधिकाधिक तीन ते चार दिवसांचासुद्धा असतो. त्यामुळे या काळात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला, कपडे, सौंदर्यप्रसाधने, चहा पाणी, खाद्यपदार्थ, खेळणी, मनोरंजन साहित्याची दुकाने लागून त्यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळतो. रात्री नाटक, कीर्तन, गोंधळ, लावणी, कव्वाली यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असून, ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण दिसून येते. 

थरार व आनंदसाधारणपणे पहिल्या दिवशी एक एक जोडी सोडून त्यांचे सेकंद लक्षात घेऊन दुसऱ्या दिवशी समान सेकंद असणाऱ्या जोडीची शर्यंत लावली जाते. या शर्यतीचा आनंद व थरार पाहून अंगावर काटे येतात.

कारागीर, सुतारांना सुगीचे दिवससद्यःस्थितीत शेतीच्या कामात बैलांचा वापर फार कमी झालेला असला तरी शंकरपटामुळे देशी गाय व बैल पाळणे यात वाढ होत आहे. पटांच्या आयोजनामुळे छकडा व इतर साहित्य बनविण्यासाठी शेतकऱ्यांची सुताराकडे गर्दी दिसून येत असून, कारागिरांना सुगीचे दिवस आल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा