शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

शहापूर प्रादेशिक पाणीपुरवठ्याचे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:31 IST

सर्वांना शुध्द पाणी मिळावे या हेतुने भारत निर्माण योजनेअंतर्गत शहापूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. यात कोरंभी येथे पाण्याचे स्त्रोत तर बेला येथे जलशुध्दीकरण यंत्रणा उभारण्यात आली. मात्र मागील पंधरा दिवसापासुन आचारसंहितेच्या विळख्यात येथील दुरुस्तीचे काम रेंगाळले असल्याने शुध्द पाण्यासाठी महिलांची भटकंती होत आहे.

ठळक मुद्देदहा वर्षांची पूर्ण खर्चित योजना रखडली : नवीन पाणीपुरवठा योजना तिसऱ्यांदा मंजूर

प्रल्हाद हुमणे।लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : सर्वांना शुध्द पाणी मिळावे या हेतुने भारत निर्माण योजनेअंतर्गत शहापूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. यात कोरंभी येथे पाण्याचे स्त्रोत तर बेला येथे जलशुध्दीकरण यंत्रणा उभारण्यात आली. मात्र मागील पंधरा दिवसापासुन आचारसंहितेच्या विळख्यात येथील दुरुस्तीचे काम रेंगाळले असल्याने शुध्द पाण्यासाठी महिलांची भटकंती होत आहे.जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भंडारा अंतर्गत शहापुर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनाद्वारे बेला, भोजापूर, उमरी-फुलमोगरा, शहापुर, गोपीवाडा, परसोडी, ठाणा येथील गावांना बेला येथील जलशुध्दीकरण केंद्राद्वारे पाणीपुरवठा सुमारे बाराशे नळ धारकांना केला जातो. ही पाणीपुरवठा योजना पुर्वी म्हणजे चारवर्षापुर्वी जिल्हा परिषद भंडाराकडे देखभाल दुरुस्तीचे कामे होती.यावेळी सोळा ते सतरा लाख रुपये वार्षिक खर्च हिशेब होता. आता बेला ग्रामपंचायतीकडे देखभाल दुरुस्तीचे कामे दिली. तेही फक्त तेरा ते चौदा लाख रुपयाचा. या तफावतीचे नेमके कोणते कारण अद्याप गुलदस्त्यात दडलेले आहे. दुसरी बाब म्हणजे बाब अत्यंत जिव्हाळ्याचा दैनिक गरजेचा विषय. मात्र मागील पंधरा दिवसापासून शहापूर येथील राष्टÑीय महामार्ग दरम्यान मुख्य जलवाहिनी नादुरुस्त अवस्थेत तसीच जिल्हाधिकारी यांच्या दालनात आचारसंहितेमुळे पडून आहे.यामुळे परसोडी, ठाणा येथील अडीचशे नळधारकांना शुध्द पाण्यापासुन वंचित रहावे लागत आहे. याउलट ठाणा येथील दिड कोटीची नवीन पाणीपुरवठा योजना १० वर्षापासुन रेंगाळत पडलेली आहे. जवळपास पुर्ण पैसे खर्च झाले. मात्र ठाणा वासीयांना एक थेंब पाण्याचा मिळालेला नाही. यात ग्रामस्थांनी झालेल्या खर्चात अफरातफरचा ठपका ठेऊन संबंधी यंत्रणेला दोषी माणून त्यांच्याविरुध्द एकमुखी न्यायालयात जनहित याचीका दाखल करण्याचा ठराव ११ फेब्रुवारी २०१९ रोजी घेण्यात आला आहे.यालाही आम्हाला न्यायालयात जनहित याचीका दाखल करण्याचा ठराव ११ फेब्रुवारी २०१९ रोजी घेण्यात आले. यालाही आम्हाला न्यायालयात जाण्याच्या व जनहित याचीका दाखल करण्याचा अधिकार नाही असे ग्रामपंचायत व पंचायत समिती विभाग म्हणतात. असे मागील आठवड्याच्या तहकुब ग्रामसभेत उपस्थित जनतेला सांगण्यात आले. मात्र लेखी पुरावा देण्यात आलेला नाही. येथे मात्र घोडे कुठतरी भिझतय.संपूर्ण याउलट दिड कोटीची पाणीपुरवठा योजनाचे पाईप लाईन निकामी झाले, यामुळे यंत्रणा पाणीपुरवठा करु शकत नाही. अशी सारवा सारव करीत ग्रामसभेत नवीन विद्यमान ग्रामपंचायत कमेटी व पाणीपुरवठा समितीने ग्रामस्थासमोर प्रस्ताव ठेवला. याला विरोध जनतेनी केले. याकडे आता कोण मायबाप उरलेला आहे की जो ठाणा पाणीपुरवठा योजना तळीस नेणार याचा शोध घेणे आज सर्व गावकऱ्यांकडे प्रश्न पडलेला आहे. जिल्ह्याचे मुख्य याकडे जातीने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई