शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

‘शिवाजी’च्या विधी महाविद्यालयाचे सात विद्यार्थी न्यायाधीश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:01 IST

न्यायाधीशपदासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची गुणानुक्रमे नावे अशी - महेश पदवाड, स्मिता उके, गौरव तराळ, निकिता पाचडे, सुप्रिया देशमुख, दीपिका उपाध्याय व नरेश उताणे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या मार्गदर्शनात डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयातर्फे न्यायाधीश पदासाठीचे एमपीएससी कोचिंग सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोचिंग सेंटरचे संचालक राजेश पाटील हे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयातील एकाच वेळी सात विद्यार्थी न्यायाधीशपदी निवडले गेले आहेत. एमपीएससीमार्फत घेतली जाणारी न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या परीक्षेसाठीचे सर्व टप्पे उत्तीर्ण करून विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले.न्यायाधीशपदासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची गुणानुक्रमे नावे अशी - महेश पदवाड, स्मिता उके, गौरव तराळ, निकिता पाचडे, सुप्रिया देशमुख, दीपिका उपाध्याय व नरेश उताणे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या मार्गदर्शनात डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयातर्फे न्यायाधीश पदासाठीचे एमपीएससी कोचिंग सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोचिंग सेंटरचे संचालक राजेश पाटील हे आहेत. राजेश पाटील यांनी त्यांच्याकडून पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत अशी तीन टप्प्यांची परिपूर्ण तयारी करून घेतली. यंदा या परीक्षेला डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या एमपीएससी कोचिंग सेंटरवरून १८ विद्यार्थ्यांनी पूर्वपरीक्षेसाठी नोंद केली होती. यामधून १४ विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले. नऊ विद्यार्थी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाले. यापैकी सात जणांनी मुलाखत यशस्वी करून अंतिम यादीत स्थान पटकावले.प्रभारी प्राचार्य प्रणय मालवीय प्राध्यापक वृंद व संस्था संचालक, कर्मचारी यांनी विद्यार्थी आणि महाविद्यालयाने मिळविलेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले.राजेश पाटील यांचे प्रयत्न फळालाएकाच महाविद्यालयातून एका वेळी सात न्यायाधीश राज्याला मिळणे ही अमरावती जिल्ह्यासाठी बहुमानाची बाब ठरली आहे. २०१० साली न्यायाधीशपदाची परीक्षा उत्तीर्ण झालेले; पण तरीही न्यायाधीश घडविण्यासाठी कार्यरत असलेले प्राध्यापक राजेश पाटील यांच्या कौशल्यपूर्ण प्रयत्नांनी महाविद्यालयाला हे यश संपादन करता आले.

टॅग्स :Studentविद्यार्थी