खून प्रकरण : शहरात गँगवारची शक्यतातुमसर : येथील हेमंत उके खून प्रकरणातील पाच आरोपींना न्यायालयाने ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली होती.याप्रकरणी आरोपी संतोष डहाट (३०), अमन मेश्राम (२२), कैलाश साठवणे (२४), निशिकांत राऊत (२५) सर्व रा.आंबेडकर वॉर्ड, प्रशांत गभने (२५) रा.कुंभारे वॉर्ड तुमसर अशी आरोपींची नावे असून त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या खूनप्रकरणी तुमसर पोलिसांनी आरोपीविरुध्द गुन्हे नोंदविले आहेत. घटनेच्या दिवशी सोमवारला सायंकाळी हेमंत उके हे नेहमीप्रमाणे बाबू बॅनर्जी, सुमीत गौतम व बिट्टू शिंगाडे हे चौघे मित्र जीममध्ये गेले होते. तिथून परतताना सुमित व बिट्टू हे एका दुचाकीने तर बाबू व हेमंत हे दुसऱ्या दुचाकीने जात होते. दरम्यान कामानिमित्त हेमंत व बाबू थांबले होते. तितक्यात मागून दोन दुचाकी व एक व्हॅन जवळ येऊन थांबली. एका दुचाकीवर संतोष डहाट, सतीश डहाट दुसऱ्या दुचाकीवर कैलाश साठवणे, आशिष गजभिये यांनी गोळ्या झाडल्या. या गोळ्या डोक्याला लागल्यामुळे हेमंतचा जागीच मृत्यू झाला. (तालुका/शहर प्रतिनिधी)
‘त्या’ पाच आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2017 00:16 IST