शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
8
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
9
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
10
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
11
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
12
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
13
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
14
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
15
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
16
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
17
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
18
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
19
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
20
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक

आधार हरपलेल्या निराधारांची योजनेच्या लाभासाठी ससेहोलपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 22:12 IST

ज्या मुलांना मोठे करण्यासाठी आयुष्य वेचले, रक्ताच पाणी करून शिकवले, तिच मुलं आपल्या आई-बापांना आयुष्याच्या शेवटी वाºयावर सोडतात. रक्ताचं नातं असलेली मुलं नोकरीच्या निमित्ताने शहरात अथवा परदेशात रममान झालेली आहेत.

ठळक मुद्देलाखांदूर तालुक्यातील प्रकार : निराधार योजना कार्यालय वाऱ्यावर, योजनांमध्ये गरजूंपेक्षा श्रीमंतांचा अधिक भरणा

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : ज्या मुलांना मोठे करण्यासाठी आयुष्य वेचले, रक्ताच पाणी करून शिकवले, तिच मुलं आपल्या आई-बापांना आयुष्याच्या शेवटी वाºयावर सोडतात. रक्ताचं नातं असलेली मुलं नोकरीच्या निमित्ताने शहरात अथवा परदेशात रममान झालेली आहेत. मुलं असतानाही निराधार झालेल्या वयोवृध्दांसाठी शासनाकडून दारिद्र्यरेषेखालील गरजू, गरीब, वृद्ध, निराधार, परितक्ता, विधवा व अपंगाना अर्थसहाय्य देण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील निराधार व वृद्ध संबंधित शासकीय कार्यालय, बँकांचे उंबरठे झिजवत आहेत. एवढी ससेहोलपट करुनही लाभ मिळत नसल्याची व्यथा आहेत.समाजातील निराधार, दुर्बल घटकास तसेच निराधार वयोवृद्ध व्यक्तींना जीवन जगण्यासाठी बळ मिळावे, यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे योजनेंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय कुंटुब योजना या योजना राबविल्या जातात. या लाभार्थ्यांना वेळेवर व पारदर्शक पद्धतीने आर्थिक मदत मिळत नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांना बँकाकडून हेळसांड होत असून काही ठिकाणी निराधारांना अपमानास्पद वागणूक मिळत आहे. काही बँकांमध्ये निराधारांचे खाते काढण्यास टाळाटाळ होत आहे.सध्या अस्तित्वात असलेल्या लाभार्थ्यांपेक्षा जास्त नागरिक अद्यापही मदतीच्या प्रतिक्षेत असताना प्रशासकीय यंत्रणेकडून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी कुठलीच कारवाई केली नाही. एखाद्या पात्र लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयाचे वारंवार उंबरठे झिजवून लाभ मिळत नाही. बोगस लाभार्थ्यांना दलालामार्फेत तत्काळ लाभ दिला जात असल्याने या योजनांपासून खरे लाभार्थी वंचित राहिले आहेत.प्रत्येक कार्यालयात दलालांचा सुळसुळाट झाल्याने निराधारांचे आर्थिक शोषण होत आहे. तालुक्यात संजय गांधी निराधार समित्यांच्या बैठका वेळच्यावेळी होत नसल्याने लाभार्थ्यांच्या प्रस्तावाला मंजूर केले जात नसल्याची स्थिती तालुक्यात आहे. निराधार योजनांच्या कार्यालयाला रिक्त पदाचे ग्रहण लागले आहे. जिल्हास्तरीय कार्यालयात निम्यापेक्षाही जास्त पदे रिक्त असून तालुकस्तरावरील कार्यालयात कर्मचाºयांची वाणवा आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात माहितीचा अभाव असून निराधार नागरिकांचे कामे प्रलंबित आहेत. शासनातर्फे राबविल्या जाणाºया या अनुदान योजनांचे अनुदान आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. योजनेच्या लाभार्थ्यांपैकी बहुतेक नागरिकांचे जीवन या अनुदानावरच अवलंबून आहे. त्यामुळे अनेक लाभार्थी अनुदानाच्या प्रतिक्षेत असताना पण बºयाच वेळा लाभार्थ्यांना या अनुदानांचे वितरण वेळेवर होत नाही. एकतर शासन बँकाकडे वेळच्या वेळी अनुदान पाठवित नाही. पाठविलेच तर बँका लाभार्थ्यांना निर्धारित वेळेत अनुदानाचे वितरण करीत नाही. त्यामुळे या अनुदानासाठी बँकाकडे चकरा मारुन थकून जातात. त्यामुळे बँकाकडून लाभार्थ्यांची नेहमी हेळसांड होत आहे. लाभ मिळवून देण्याच्या नावावर दलाल तहसील कार्यालयात सक्रीय झाले आहेत.