भंडारा : दु:खी, गरीब व अज्ञानी मानवाला भगवतप्राप्तीच्या निष्काम भावनेने परिचय करुन देऊन सुखमय जीवन जगण्यासाठी प्रेरीत करणे, वाईट व्यसन, अंधश्रध्दा यापासून परावृत्त करणे हे मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांची शिकवण आहे. त्यांच्या शिकवणीप्रमाणे सेवकांनी जनजागृती करावी, असे प्रतिपादन माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले.भंडारा तालुक्यातील माडगी (टेकेपार) येथे परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर व सर्व सेवकांच्या वतीने रविवारी, सेवक संमेलनाचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.संमेलनाचे उद्घाटन मंडळाचे मार्गदर्शक कृष्णाजी कडव यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शेषराव शेंडे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य राजू सय्याम, वामन शेंडे, भुरे, मेश्राम, टेंभुर्णे,विजय भोंदे, निलकंठ कायते, ठाणेदार गोंदके, सार्वे, सरपंच वासुदेव गेंडेकार, दुधराम बोरीकर, देवाजी नागपुरे, टेकराम पडोळे, साधना राऊत आदी उपस्थित होते.तत्पूर्वी सकाळी जनार्धन पाल यांच्या निवासस्थानी हवन कार्य पार पडले. त्यानंतर गावातून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी विविध देखावे काढण्यात आले. त्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. दुपारी मानव धर्म शिकवणीवर परिसंवाद व चर्चासत्र घेण्यात आला. सांयकाळी आयोजित महाप्रसादाचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. रात्री बापुशा चाखोळा यांचा भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. संमेलनासाठी समितीचे जनार्धन पाल, विजय रणदिवे, सुखदेव मस्के, शंकर पाल, भोजिराम नागापुरे, प्रदीप मस्के, सुनिल चौधरी, प्रमोद नागापुरे, जितेंद्र नागापुरे, विनोद पाल, रोशन पाल, महेश नागापुरे, प्रशांत समरीत, अनिल बांगाडकर, पुष्पराज मेश्राम, सखारात सय्याम, मनोज करंडे आदिंनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)
सेवकांनो, व्यसनमुक्तीसाठी पुढाकार घ्या
By admin | Updated: January 18, 2015 22:40 IST