शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

17 ऑगस्टपासून मुलांना शाळेत पाठवायचे का? पालक संभ्रमात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 05:00 IST

आपल्या पाल्यांना शाळेत पाठवल्यावर ते सुरक्षित राहतील काय? हीच मुख्य चिंता पालकांना सतावत आहे. ज्येष्ठांना  किंवा १८ वर्ष वयोगटावरील नागरिकांना जसे लसीकरण करण्यात आले तसेच बालकांबाबतही लसीकरण होणार आहे काय? ते सुरक्षित कसे राहतील याची आता चर्चा होऊ लागली आहे. १७ ऑगस्टपासून इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या  असल्याने हा विषय चांगलाच रंगला आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आधी आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहे आहेत. आता इयत्ता पहिली त्या सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात ऊहापोह सुरू आहे.  मात्र काेरोनाची भीती कायम असून पालकगण १७ ऑगस्टपासून मुलांना शाळेत पाठवायचे का? या विचारात गुंतले आहेत.माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यात इयत्ता पहिली ते सातवीच्या एकूण ९६५ शाळा आहेत. त्यामधून हजारो विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत. कोरोनाच्या संसर्गामुळे दुसऱ्या लाटेमुळे शाळा सुरू झाल्या नव्हत्या. मात्र जिल्ह्यात कोरोना संक्रमणाची स्थिती पाहता इयत्ता आठवी ते बारावीची वर्ग सुरू करण्यात आले होते. मात्र तिथेही विद्यार्थ्यांची पटसंख्या हव्या त्या प्रमाणात दिसून येत नाही. अजूनही पालकांच्या मनात कोरोना संक्रमणाची स्थिती व भीती कायम आहे. शहरातही हवा तेवढा प्रतिसाद दिसून आलेला नाही. आपल्या पाल्यांना शाळेत पाठवल्यावर ते सुरक्षित राहतील काय? हीच मुख्य चिंता पालकांना सतावत आहे. ज्येष्ठांना  किंवा १८ वर्ष वयोगटावरील नागरिकांना जसे लसीकरण करण्यात आले तसेच बालकांबाबतही लसीकरण होणार आहे काय? ते सुरक्षित कसे राहतील याची आता चर्चा होऊ लागली आहे. १७ ऑगस्टपासून इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या  असल्याने हा विषय चांगलाच रंगला आहे. शिक्षण  वर्तुळातही शाळा सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे शाळा परिसर निर्जंतुकीकरण करणे, कोविड नियमांचे पालन व अन्य बाबींवरही भर दिला जात आहे. जिल्ह्यात सातवीच्या ९६५ शाळा असल्या तरी त्यातील तीनशेच्या जवळपास शाळा सुरू होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. शाळा सुरू व्हायला अजून आठ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने त्यात वाढ होण्याची दाट  शक्यता व्यक्त केली जात आहे वर्गनिहाय विद्यार्थी संख्येवर नजर घातल्यास जिल्ह्यातील पहिली इयत्तामध्ये १६५४३ विद्यार्थी शाळेत जाणार आहेत. तसेच इयत्ता चौथी अंतर्गत १७६१७ तर पाचवीमध्ये १७२१७ विद्यार्थी शाळेत जातील मात्र यापैकी किती शाळा उघडणार ही येणारी वेळच ठरविणार आहे. पुन्हा शाळा परिसर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने गजबजणार असल्याचे दृश्य आहे.

पालकांना मुलांच्या आरोग्याची चिंता

मुलांचा पुढचा पाया मजबूत करायचा असेल तर शाळा सुरू झाल्या पाहिजेत. मात्र लहान मुलांच्या आरोग्याची काळजी शिक्षण व आरोग्य विभागाने घेतली पाहिजे. ज्याप्रमाणात १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण होत आहे, तसेच मुलांचे लसीकरण ही व्हायला हवे. यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत. याची माहिती पालकांना मिळणे अपेक्षित आहे. जेणेकरून पालकांमध्ये संभ्रम राहणार नाही. याकडे शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.-नितीन मोहारे, पालक, कान्हळगाव (सिर.) 

गत १५ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. मूल घरी गोंधळ करतात. मूलभूत शिक्षणाचा पाया कच्चा राहता कामा नये. ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षण अश्यक्य आहे. आता कोरोना कमी झाला आहे. पहिलीपासूनची शाळा सुरू करायला हरकत नसावी. पण, पालकांच्या मनात शंका राहू नये म्हणून सुरक्षेतेसाठी मुलांचे लसीकरण केले पाहिजे. समन्वय करूनच विचाराअंती शाळा सुरू कराव्यात.-श्याम चकोले,  पालक, मोहगाव देवी

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या