शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

गॅस सिलिंडरच्या भडक्यात घर बेचिराख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:00 IST

कैलास किसन देशमुख यांचे निलज येथे घर आहे. ते जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असून त्यामुळे त्यांनी घरालगतच एका कौलारू घरात तात्पुरता आश्रय घेतला आहे. सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास स्वयंपाकानंतर त्यांची पत्नी रेग्युलेटरचा स्वीच बंद करण्यासाठी गेल्या.

ठळक मुद्देनिलजची घटना : रोखेसह साहित्य भस्मसात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गॅस सिलिंडरच्या भडक्याने घराला आग लागून संपूर्ण घर बेचिराख झाल्याची घटना पवनी तालुक्यातील निलज येथे बलिप्रतिपदेच्या दिवशी सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. या आगीत एक लाख रूपये रोख आणि घरातील कपडेलत्ते व साहित्य जळून भस्मसात झाले.कैलास किसन देशमुख यांचे निलज येथे घर आहे. ते जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असून त्यामुळे त्यांनी घरालगतच एका कौलारू घरात तात्पुरता आश्रय घेतला आहे. सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास स्वयंपाकानंतर त्यांची पत्नी रेग्युलेटरचा स्वीच बंद करण्यासाठी गेल्या. परंतु स्वीच बंद होत नव्हता. त्यातच गॅस गळती होवून भडका झाला. आग विझविण्यासाठी शिक्षक कैलास देशमुख धावून गेले. त्यांचे दोनही हात किरकोळ स्वरूपात भाजले. आग आटोक्यात आली नाही. उलट संपूर्ण घर या आगीने कवेत घेतले. गावकऱ्यांनी लगतच्या बोरवेलवरील मोटारपंप सुरू करून पाण्याचा मारा केला. त्यामुळे आग आटोक्यात आली. परंतु तोपर्यंत घरातले सर्व साहित्य जळून खाक झाले होते.बांधकाम मंजुरीसाठी रोख एक लाख रूपये देशमुख यांनी घरी ठेवले होते. ते या आगीत जळून भस्मसात झाले. तसेच दिवाळीनिमित्त खरेदी केलेले संपूर्ण साहित्य, कपडे, धान्य जळाले आहे. यात त्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले असून पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.नुकसानभरपाईची मागणीदिवाळीच्या काळात घर बेचिराख झाल्याने कैलाश देशमुख यांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाने तात्काळ पंचनामा करुन मदत देण्याची मागणी होत आहे. तसेच संबंधित गॅस एजन्सीनेही सिलेंडरचा स्वीच का बंद होत नव्हता, याची चौकशी करण्याची मागणीही केली जात आहे.

टॅग्स :Accidentअपघात