शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआय विद्यार्थ्यांचे कौशल्य पाहून पालकमंत्री थक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 22:51 IST

सौर उर्जेवर ३५ किमी धावणारी सायकल, वॉटर हार्व्हेस्टिंग, वीज वापर, पाण्याची बचत असे एकापेक्षा एक सरस मॉडेल्स पाहून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे थक्क झाले. निमित्त होते भंडारा येथे आयोजित आयटीआयच्या जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनाचे. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रतिकृतीतून समाजहिताचा संदेश दिला.

ठळक मुद्देतंत्रप्रदर्शन : ७८ संस्थांचे २०० मॉडेल्सचे भंडारा येथे सादरीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सौर उर्जेवर ३५ किमी धावणारी सायकल, वॉटर हार्व्हेस्टिंग, वीज वापर, पाण्याची बचत असे एकापेक्षा एक सरस मॉडेल्स पाहून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे थक्क झाले. निमित्त होते भंडारा येथे आयोजित आयटीआयच्या जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनाचे. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रतिकृतीतून समाजहिताचा संदेश दिला.जिल्हा व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या वतीने भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील शासकीय, खाजगी आयटीआय आणि एनसीव्हीसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या तंत्रप्रदर्शनाचे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत करण्यात आले होते. यात ७८ संस्था सहभागी झाल्या होत्या. तेथील विद्यार्थ्यांनी २०० प्रतिकृती सादर केल्या होत्या. उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. परिणय फुके, आमदार रामचंद्र अवसरे, नगराध्यक्ष सुनील मेंढे, नगरपरिषद उपाध्यक्ष आयु गोड्डाने, जिल्हाधिकारी शांतनू गोयल उपस्थित होते. या प्रदर्शनात अपारंपारिक उर्जा स्त्रोताचा वापर, फॅशन टेक्नालॉजी, माहिती तंत्रज्ञान, आॅटोमोबाईल्स, कृषी, वॉटर हॉर्व्हेस्टिंग, वीज वापर, इंजिनियअरिंग आणि नॉन इंजिनियरिंग अशा प्रतिकृती सादर करण्यात आल्या. उद्घाटनानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देवून प्रतिकृतीची पाहणी केली. त्यावेळी सौर उर्जेवर ३४ किमी धावणारी सायकल पाहून मंत्री महोदय चकीत झाले. मी स्वत: उर्जा खात्याचा मंत्री असून मला आज येथे नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळाली, असे सांगितले. याप्रदर्शनात मांडलेल्या प्रतिकृतीचे त्यांची कौतुक केले.या कार्यक्रमाला सहसंचालक चंद्रकांत निनावे उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य मोहन चौधरी यांनी केले.राज्यातील सर्वात मोठे प्रदर्शनभंडारा येथे आयोजित करण्यात आलेले आयटीआय विद्यार्थ्यांचे हे प्रदर्शन राज्यातील सर्वात मोठे प्रदर्शन असल्याची माहिती आयोजक तथा जिल्हा व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधिकारी प्रदीप घुले यांनी दिली. ते म्हणाले, गत दोन वर्षापासून भंडारा येथे रोजगार मेळावा घेतला जात आहे. त्यातून जवळपास ८०० बेरोजगार तरूणांना रोजगार मिळाल्याचे त्यांची सांगितले.