शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या टेलिफोनबंदचे रहस्य?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2017 00:27 IST

गंभीरता, तत्परता, कर्तव्यपरायणता, शिस्त अशा अनेक गुणांची व्याप्ती असणारा कोणता विभाग असेल.

राजू बांते। लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : गंभीरता, तत्परता, कर्तव्यपरायणता, शिस्त अशा अनेक गुणांची व्याप्ती असणारा कोणता विभाग असेल. आठवले ना? तो आहे पोलीस विभाग. संवेदनशील असलेल्या या विभागाच्या काही पोलिसांमुळे अख्खा पोलीस विभाग आरोपीच्या पिंजऱ्यात पाहिला जातोय.पोलीस हे जनतेचे मित्र असावे. यासाठी पोलीस खात्यानेच पोलीस मित्र उपक्रम राबविला होता. आठवतेय. पण, हे मित्र केवळ ओळखपत्र घेण्यासाठीच होती काय असा प्रश्न त्यावेळी पडला. आताही पडतोय. सामान्य जनतेची मित्र पोलीस असू शकतात याचे उत्तर अनेकांना देता येईल. त्यातून सरासरी उत्तर येईल ‘नाही’. असे काय करतात पोलीस. जी अजूनही सामान्य माणसांशी मैत्री जोडू शकली नाही. नेता, सत्ता, राजकारण अन् याच्या प्रभावाखाली चेपलेली ही यंत्रणा आपला केविलवाणा धाक, जोर अन् हिसका कमजोर माणसांवरच दाखवू शकतात. कारण ती इतकी शक्तीहिन असतात त्याचा जोर चालूच शकत नाही. खरे असूनही ते आपले म्हणणे सिद्ध करू शकत नाही. सत्ता, पैसा अन् राजकारण्यांच्या भोवती हिंडणारी माणसे अंग चोरल्यासारखी उभी राहतात. एकंदर विषय असा सामान्यांसाठी पोलीस यंत्रणाच नाही. त्याचा पुरावा अन् आंखो देखी प्रकरणातून दिसायला लागेल. मोहाडी पोलीस स्टेशनचा टेलिफोन बंद राहतो. याचा प्रत्यय अनेकांना आलाय. पण, तो टेलिफोन बंद राहत होता काय? याचे बिंग फोडले ‘लोकमत’ने. पोलीस स्टेशनमधील काही पोलीस टेलिफोनचा आवाजच बंद करीत असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले. त्यानंतर पुढे जे काही समोर आले ते अगदी भयानक होत. पोलीस निरीक्षकांना सांगितले फोन बंद आहे, तक्रार दिली आहे. पण, दूरभाष केंद्रात तक्रारच नाही. दुसऱ्या दिवशी दूरभाष केंद्राच्या आॅपरेटरनी सत्यच बाहेर काढले. पोलीस स्टेशनचे ठाणेदार असे खोटे का बोलले. त्या अगोदर काही पोलिसांना दूरभाष केंद्राला अन् पावसाला दोषी ठरविले. पण जेव्हा सत्यता बाहेर पडली तेव्हा पोलीस स्टेशनची चांगलीच रिंग वाजली. एका संवेदनशिल कार्यालयाने फोन बंद पाडणे गुन्हा ठरतो. आजवर यावर पांघरून घातले गेले. झाकले गेले. पण, झाकून किती झाकणार एक दिवस उघडच होतो ही जाणीव पोलीस खात्याला ठाऊक असताना असा खोडकरपणा का केला असावा. याला कारण अशी, दिवसभर कोणत्या ना कोणत्या कारणांनी रिंग वाजत असते. रात्रीलाही या रिंगने झोपमोड होते. ही रिंगची कटकटच बंद केली तर किती आराम मिळेल ही भावना पोलिसांच्या डोक्यात शिरली. तेव्हापासून फोन बंदचा नाटकी देखावा होत असावा. मोठे पोलीस अधिकारी नेते टेलिफोनवर कॉल करीत नाही. ते आता सरळ अधिकाऱ्यांनी मोबाईलवर संवाद साधतात. मोबाईलमुळे या टेलिफोनची रिंग वाजली काय? नाही काय फरक पडत नव्हता. त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये राहणाऱ्या पोलिसांना आरामच आराम. हे प्रकरण साधे नाही. हे प्रकरण गुन्ह्यास पात्र आहे. किती दिवसापासून हा टेलिफोन बंदचा कारभार सुरु होता. मागील पाच सहा महिन्यात या टेलिफोनवर कुणाकुणाचे कॉल झाले. किती फोन रिसीव्ह झाले. याची चौकशी होणे गरजेचे झाले आहे. तसेच पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. यातही दिसेल कोण आहेत ते ज्यांनी टेलिफोन मधील बटणाशी छेडछाड केली. याची पोलीस अधीक्षकांनी चौकशी करायला पाहिजे. टेलिफोन बंदमुळे अनेक तक्रारी पोलिसात येण्यापूर्वीच निरस्त झाल्या. काही गुपीत तक्रारी देणारी माणसे, खबर देणारी व्यक्तींना फटका बसला. लहान घटना दबून गेल्या. या टेलिफोनवर सामान्य व्यक्तीच बहुधा फोन करतो. त्यामुळे त्या सामान्य माणसांच्या तक्रारीचा आवाज दाबला गेला. संवेदनशिल अन् कर्तव्य पार पाडणारा हा विभाग संवेदनाहिन कसा होवू शकतो. जनतेनी मित्र म्हणावे ही अपेक्षा पोलीस विभागानी का करायची. सामान्य माणून पोलीस विभागापासून दूर का पळतो याची कारणे माहित असतानाही मूल्य हरविलेल्या पोलिसांना कोण समजावून सांगणार. पोलिसांना पुन्हा एकदा त्यांचे कर्तव्य, निष्ठ, शिस्ती सोबतच सामाजिकतेची जाण अन् प्रेरणा देणारे धडे व सकारात्मक दृष्टीकोनाचे प्रशिक्षण देण्याची वेळ आता आली आहे.