शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गुप्तधन शोधणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 22:42 IST

येथील सराळ तलावालगतच्या शेतातील एका दगडाखाली गुप्तधन आहे असे समजून १५ फेब्रुवारीच्या रात्री खोदकाम करणाºया एका टोळीला जेरबंद करण्यात साकोली पोलिसांना यश आले आहे.

ठळक मुद्देसासरा येथील घटना : आठ आरोपींना अटक, पसार आरोपीच्या मागावर पोलीस

आॅनलाईन लोकमतसासरा : येथील सराळ तलावालगतच्या शेतातील एका दगडाखाली गुप्तधन आहे असे समजून १५ फेब्रुवारीच्या रात्री खोदकाम करणाऱ्या एका टोळीला जेरबंद करण्यात साकोली पोलिसांना यश आले आहे. गुप्तधन शोधणाऱ्या टोळीत १२ ते १५ लोकांचा समावेश असावा असा अंदाज आहे. गुप्तधनाच्या शोधात खोदकाम करणाऱ्या टोळीतील सासरा येथील दोन व्यक्तीसह अन्य सहाजण असे आठ लोकांना पोलिसांनी अटक केली आहे.१५ फेब्रुवारीच्या रात्री ८ वाजता सासरा येथील एक शेतकरी विद्युतपंप सुरू करण्याकरिता गेला असता सासरा-मिरेगाव मार्गावरील चिंचेच्या झाडाजवळ दुचाकी ठेऊन काही लोक खोदकामाची अवजारे घेऊन सराळ तलावाच्या दिशेने जात असल्याचे त्या शेतकऱ्याने पाहिले. त्यानंतर ही माहिती गावात सांगताच हा गुप्तधन शोधण्याचा प्रकार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर गावातील काही तरूणांनी या प्रकाराची माहिती घेतली असता १२ ते १५ लोकांची टोळी शेतातील दगडाच्या सभोवताल खोदकाम करीत होते. यावेळी काही मांत्रिक विधी करीत असल्याचे दिसताच हा गुप्तधन शोधण्याचा प्रकार असल्याची खात्री पटली. त्यानंतर काही लोक त्यांच्या पाळतीवर राहिले तर काहींनी साकोली पोलीस ठाण्यात माहिती दिली.अवघ्या काही वेळेतच साकोली पोलिसांचा ताफा गावात दाखल झाला. सापळा रचून या टोळीतील आठ जणांना पकडण्यात आले. त्यातील काहीजण पसार झाले. या प्रकाराची माहिती गावात होताच लोकांचे जत्थे त्यादिशेने जाताना दिसू लागले. सकाळी काही मंडळी घटनास्थळाकडे जात असताना त्या टोळीतील एक व्यक्ती तणसीच्या ढिगात लपून असलेला आढळून आला. लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. गुप्तधन शोधणाऱ्या टोळीत ब्रम्हपुरी, कुर्झा, भंडारा, रेंगेपार, सावरबंद, कुंभली, सासरा येथील लोकांचा समावेश असावा असा संशय पोलिसांनी वर्तविला आहे. तपास साकोली पोलीस करीत आहेत.