शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन रूजवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:21 IST

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती १९८२ सालापासून समितीचे संस्थापक, राष्ट्रीय संघटक तथा जादुटोना विरोधी कायद्याचे रचनाकार प्रा. श्याम मानव यांच्या नेतृत्वात संपूर्ण भारतात प्रबोधनाचे कार्य करीत आहे.

ठळक मुद्देपंकज वंजारे : युवा शिबिराचे आयोजन, युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती १९८२ सालापासून समितीचे संस्थापक, राष्ट्रीय संघटक तथा जादुटोना विरोधी कायद्याचे रचनाकार प्रा. श्याम मानव यांच्या नेतृत्वात संपूर्ण भारतात प्रबोधनाचे कार्य करीत आहे. समिती कुठल्याही देवा धर्माला विरोध न करता समाजातील अनिष्ठ प्रथा आणि अंधद्धांच्या निर्मूलनासाठी व वैज्ञानिक दृष्टीकोन रूजविण्यासाठी प्रयत्न करते, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंनिसचे युवा शाखेचे महाराष्ट्र राज्य संघटक पंकज वंजारे यांनी केले.अ.भा. अंनिस व रासेयो भंउारा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय जादूटोना विरोधी कायदा आणि वैज्ञानिक दृष्टीकोन विषयावर आयोजित युवा प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. कार्तिक पनीकर, प्रशासकीय प्रमुख जे.एम. पटेल महाविद्यालय भंडारा, प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. राजेंद्र शहा, जिल्हा समन्वयक रासेयो भंडारा प्रा. ममता वासनिक आजीवन अध्ययन केंद आणि विस्तार विभाग प्रमुख जे.एम. पटेल महाविद्यालय डी.जी. रंगारी उपाध्यक्ष अ.भा. अंनिस भंडारा जिल्हा कोषाध्यक्ष ए.बी. भोयर जि. महिला संघटक प्रिया शहारे, सोनिया डोंगरे उपस्थित होते.पंकज वंजारे यांनी जादूटोना विरोधी कायद्याच्या अनुसुचीची विविध उदाहरण आणि प्रात्याक्षिकांच्या माध्यमातून माहिती देताना सांगितले की, संतांनी व महापुरूषांनी केलेल्या प्रबोधनाचा सार या कायद्यात आलेला आहे. या कायद्याच्या प्रचाराची जबाबदारी युवकांनी आपल्या खांद्यावर घेत आदर्श समाज घडवण्याचे प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. कार्तिक पानीकर म्हणाले की, अ.भा. अंनिसचे कार्य अत्यंत महत्वाचे असून अशा प्रकारचे कार्य अत्यंत महत्वाचे असून अशा प्रकारचे शिबिर मोठ्या प्रमाणात आयोजित करण्याची आज गरज आहे.डॉ. राजेंद्र शहा यांनी प्रास्ताविकात रासेयो अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार सतत प्रसारित करत असते. सशक्त युवापीढी निर्माण करण्यासाठी युवकांनी विवेकवादी होण्याची, जागृती घडवण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. प्रिया शहारे यांनीही मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सोनिया डोंगरे यांनी केले. यावेळी जे.एम. पटेल, आर.एम. पटेल, प्रगती महाविद्यालय, आठवले महाविद्यालय, पडोळे महाविद्यालय भंडारा येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अ.भा. अंनिस व रासेयो योजना यांच्या संयुकत विद्यमाने अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज या विषयावर जिल्ह्यात महाविद्यालय तालुकास्तरावर वक्तृत्व स्पर्धा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केल्या जाणार आहे.