लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासनाच्या धरसोडवृत्तीमुळे रोज नवे अध्यादेश काढुन संघटनांच्या विरोधानंतर आपलेच निर्णय रद्द करण्याची नामुष्की शासनावर आली आहे. संच निर्धारणाच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील शिक्षक मोठ्या प्रमाणात अतिरिक्त ठरले आहेत. १०० च्या खाली पटसंख्या असणाऱ्या शाळेतील मुख्याध्यापक यांनाही अतिरिक्त होण्याची वेळ आली आहे. मात्र शाळा तिथे कायम मुख्याध्यापक हवा ही संघटनेची मागणी आहे, असे प्रतिपादन संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी केले.विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, भंडारा तालुका व शहराचा संयुक्त शिक्षक मेळावा संत शिवराम महाराज माध्यमिक विद्यालय भंडारा येथे शनिवारी पार पडला. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानाहून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन संघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कार्यवाह राजेश धुर्वे, कार्याध्यक्ष चंद्रशेखर रांहागडाले, टेकचंद मारबते, के. आर. ठवरे, भाऊराव वंजारी, अनंत जायभाये, धीरज बांते, अर्चना भोयर, छाया वैद्य, कांता कामथे, माधुरी मस्के, समशाद सय्यद, जागेश्वर मेश्राम, दिनकर ढेंगे, मनोज अंबादे, शाम घावड, डी. ए. बारस्कर, मोरेश्वर वझाडे, अनिल कापटे, कुंदा बोधलकर, प्राथमिकचे जिल्हा कार्यवाह विलास खोब्रागडे, शिक्षकेत्तर कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष सैनपाल वासनिक, सचिव गंगाधर भदाडे आदी उपस्थित होते.सरकार्यवाह सुधाकर अडबाले म्हणाले, शिक्षकविरोधी निघणारे रोजचे शासन परिपत्रक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या चौकटीत बसत नसल्याने कोणतेही आदेश न्यायालयात टिकत नाही, त्यामुळे संघटनेच्या लढ्या पुढे आपलेच निर्णय शासनाला रद्द करावे लागते हे संघटनेचे यश आहे. प्राथमिक शिक्षकांना त्यांचे इच्छेविरुध्द शाळाबाह्य कामे न देण्याचे न्यायालयाचे आदेश असतांना कारवाईचा धाक दाखवून बळजबरीने शाळाबाह्य कामे दिली जातात. सभागृहात शिक्षकांच्या समस्यांना वाचा फोडणारे बळकट शिक्षक प्रतिनिधी नसल्याने रोज आदेश काढून शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग केले जातात. मराठी शाळा व शिक्षक टिकवून ठेवण्यासाठी व सभागृहात आपला आवाज बुलंद करण्यासाठी संघटनेशी प्रामाणिक रहावे, असे आवाहन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.मेळाव्याचे प्रास्ताविक शहराध्यक्ष पुरुषोत्तम लांजेवार यांनी तर, संचालन शेखर बोरकर व आभार प्रदर्शन तालुका कोषाध्यक्ष अशोक बनकर यांनी मानले. शिक्षक मेळावासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ भंडारा तालुका व शहर पदाधिकारी यांनी सहकार्य घेतले.
शाळा तिथे कायम मुख्याध्यापक हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, भंडारा तालुका व शहराचा संयुक्त शिक्षक मेळावा संत शिवराम महाराज माध्यमिक विद्यालय भंडारा येथे शनिवारी पार पडला. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानाहून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन संघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
शाळा तिथे कायम मुख्याध्यापक हवा
ठळक मुद्देसुधाकर अडबाले : भंडारा येथे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा शिक्षक मेळावा