२३ शाळांचा सहभाग : विद्यार्थी-पालकांमध्ये होता संभ्रमभंडारा : महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीच्या वतीने शिक्षण क्षेत्रात शासनाकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आजपासून (बुधवार) पुकारलेल्या दोन दिवसीय शाळा बंदचा फज्जा उडाला. जिल्ह्यातील फक्त २३ शाळांनी या बंदला प्रतिसाद दिला.राज्यातील सर्व शाळा ९ व १० डिसेंबर रोजी बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला होता. २८ आॅगस्टच्या संच मान्यतेचा शासनमान्य निर्णय रद्द करणे, खासगी शिक्षण संस्थेची स्वायत्तता कायम ठेवणे, कला व क्रीडा शिक्षकाची पूर्ण वेळ नियुक्ती करणे, १ नोव्हेंबर २०१५ पूर्वी सेवेत असलेल्या व त्यानंतरही सेवेत आलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करणे, प्राथमिक शाळांमध्ये लिपीक व सेवकांची पदे मान्य करणे, शालेय पोषण आहार योजना स्वतंत्रपणे राबविणे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कामे न देणे, अनुदानास पात्र शाळा व वर्ग तुकड्यांना अनुदान देणे, शालेय स्तरावर २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचा शिक्षण शुल्काच्या रकमेचा परतावा करणे आदी मागण्यांचा समावेश आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन संस्था संचालक मंडळाने केले होते. मात्र जिल्ह्यातील एकूण १३३१ शाळांपैकी फक्त २३ शाळांनी या बंदमध्ये सहभाग नोंदविला. जिल्हा परिषदेच्या ७९२ शाळा आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्ह्यात शाळा बंदचा फज्जा
By admin | Updated: December 10, 2015 00:46 IST