शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित आयोग सदस्यांनी आाश्रमशाळांची केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 22:58 IST

आंबागड व पवनारखारी येथील आश्रमशाळांना राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्या मायाताई इनवाते यांनी वरिष्ठ अधिकाºयांसोबत शनिवारी भेट देऊन पाहणी केली.

ठळक मुद्देआंबागड, पवनारखानी शाळा : कर्तव्यात कसूर करणाºयांवर कारवाईचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आंबागड व पवनारखारी येथील आश्रमशाळांना राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्या मायाताई इनवाते यांनी वरिष्ठ अधिकाºयांसोबत शनिवारी भेट देऊन पाहणी केली. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्युप्रकरण व मुलभूत सोयी सुविधा पुरविण्यास शाळा प्रशासन अपयशी व चौकशीदरम्यान आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.बापूजी अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत ३० जुलैला महेंद्र सलामे (१५) रा. खैरी ता. तिरोडा याचा शॉक लागून मृत्यू झाला होता. याप्रकरणात दोषीवर अद्याप कारवाई झाली नाही. संबंधितास अटक करणे व शाळा बंद न केल्यास ७ सप्टेंबरला कुलूप ठोको आंदोलनाचा इशारा भाजपच्या आदिवासी आघाडीतर्फे देण्यात आला आहे. या घटनेला शाळेचे संचालक मंडळ, सचिव, अध्यक्ष, उपाध्यक्ष, अधीक्षक यांच्याविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात आला, परंतु अजुनपर्यंत अटक झाली नाही. महावितरणचे उपसहायक अभियंता, गोबरवाही व लाईनमेन यांच्यावर कारवाई झाली नाही. मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला १० लाख रूपयांची आर्थिक मदत देण्यात यावे, संबंधित अभियंता व लाईनमेनवर फौजदारी गुन्हा नोंद करून अटक करण्यात यावी, शाळेवर नियंत्रण न ठेवणाºया आदिवासी प्रकल्प अधिकाºयांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी संघटनेने केली.पवनारखारी येथील इंदिराबाई मरस्कोल्हे अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंश, पाण्यात बुडून, जळून आणि आजार अशा घटनेत सहा विद्यार्थ्यांचा जीव आतापर्यंत गेला आहे. तत्कालीन आदिवासी प्रकल्प अधिकाºयांनी तीन वर्षापुर्वी शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. तरीसुद्धा ही शाळा सुरू आहे. आंबागड व पवनारखारी या आश्रमशाळांची उच्चस्तरीय चौकशी करून बंद करण्याची मागणी केली आहे.आंबागड शाळेच्या घटनेला एक महिना होत आहे. येथे आदिवासी समाजाची व संघटनेची दिशाभूल करणे सुरू आहे. ७ सप्टेंबरला आंदोलनाला सुरूवात करून बेमुदत उपोषण, मोर्चा व शाळेला कुलूप ठोको आंदोलन करण्यात येईल, असे आदिवासी आघाडी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बिसन सयाम, महासचिव अशोक उईके, माजी नगरसेवक लक्ष्मीकांत सलामे, दिनेश मरस्कोल्हे, माजी पंचायत समिती सदस्य प्रभा पेंदामसह पालकांनी मायाताई इनवाते यांच्याजवळ व्यक्त केली. शाळांना भेटीपूर्वी समिती सदस्य माया इनवाते खापा येथील विश्रामगृहात अधिकारी, आघाडीचे पदाधिकारी व पालकांसोबत चर्चा केली. यावेळी प्रकल्प अधिकारी बी.पी. पृथ्वीराज, तहसीलदार गजेन्द्र बालपांडे, नायब तहसीलदार निलेश गौड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.आंबागड व पवनारखारी आश्रमशाळेची तक्रारीत नमूद सर्व बिंदूची सविस्तर चौकशी करण्यात येईल, कर्तव्यात कसूर नियमबाह्य कामे करण्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.-मायाताई इनवाते, सदस्य, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, नवी दिल्ली.