नोटांचा कायम तुटवडा: कोंढा येथील बँक आॅफ इंडिया शाखेतील प्रकार लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा (कोसरा) : कोंढा येथील बँक आॅफ इंडिया शाखेत नोटाबंदीनंतर सतत बँकेत नोटा तुटवडा असते. ग्राहकांना वेळेवर त्यांचे हक्काचे रूपये मिळत नाही. तसेच येथील अधिकारी, कर्मचारी ग्राहकांशी उद्धट वागत असल्याने ग्राहकांत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.बँक आॅफ इंडिया कोंढा येथील शाखेत २८ गावांचा संबंध आहे. दररोज सकाळी १०.३० वाजता बँक उघडताच ग्राहक शाखेत पैसे काढणे, भरण्यासाठी येत असतात. श्रावणबाळ, संजय गांधी व इतर योजनाचे खातेदारांचे खाते या बँकेत आहेत. तसेच पेन्शनधारक ग्राहक मोठ्या प्रमाणात पैसे काढण्यासाठी येतात. त्यांना येथील कर्मचारी, अधिकारी समजावून सांगत नाही तर काही विचारल्यास उद्धटपणे त्यांच्याशी वागत असतात. सध्या कृषी कर्ज वाटप सुरू आहे. येथे कृषी कर्जधारकाकडून व्याज वसुल केले जात आहे. अनेक ग्राहक स्त्री-पुरूष, निरक्षर असतात. त्यांना योग्य समजावून सांगितले जात नाही.दररोज बँकेचे गेट बंदबँक आॅफ इंडिया कोंढा शाखेत दुपारी ३.३० वाजता आतमधून बँकेचे गेट बंद केले जाते. त्यामुळे आतमध्ये व बाहेर ग्राहक गेटचे कुलूप उघडण्याची वाट पाहत असतात. बँकेत दुपारी ३ वाजतानंतर ग्राहकांची गर्दी कमी असते तरी गेट का लावले जाते, असा प्रश्न ग्राहक करीत आहेत. बँकेचे काम आटोपल्यानंतर ग्राहक दुपारी गेटजवळ येऊन ताटकळत उभे राहतात. बँकेत काम करण्यासाठी रोजंदारी कर्मचारी घेतले आहेत ते ग्राहकांशी अरेरावीने वागतात. त्यावर बँक व्यवस्थापकांचे नियंत्रण राहीले नाही. कोंढा येथे बँकेचे प्रचंड व्यवहार आहेत. पण बँक अधिकारी, कर्मचारी यांच्या उद्धट व अरेरावीपणाच्या वागण्यामुळे अनेक ग्राहकांनी या शाखेत असलेले व्यवहार बंद करून दुसऱ्या गावच्या शाखेत सुरू केले आहे. बँकत आज १६ मे ला ४ वाजता दुसऱ्या बँकेचे कर्मचारी नोटा घेवून सुरक्षा कर्मचाऱ्यासह बँकेत आले तेव्हा त्यांना देखिल गेट बंद दिसली त्यांनी मोठमोठ्याने आवाज दिल्यानंतर बँकेचे गेट उघडले. हा प्रकार येथे नेहमीच होत असल्याचे त्यांना ग्राहकांनी सांगितले.कर्ज वाटप बंद अवस्थेत अनेक या परिसरात सुशिक्षित बेरोजगार आहेत. त्यांनी लहान मोठे धंदे पोट भरण्यासाठी सुरू केले आहे. त्यांना आधार म्हणून राष्ट्रीयकृत बँकेचे कर्जाची गरज असते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुद्रा लोन सुरू केले आहे. पण सध्या या बँकेत सुशिक्षित रोजगार यांना कोणतेच कर्ज दिले जात नाही. आम्हाला ग्राहकांचे व्यवहार सांभाळण्यास पूर्ण दिवस जाते. मग कर्ज प्रकरण केव्हा मंजूर करायचे असे म्हणून कर्ज प्रकरण घेतले जात नाही. केंद्र शासनाच्या मुद्रा लोनचा येथे मोजक्या लोकांना फायदा दिला आहे.बँक आॅफ इंडिया शाखा कोंढा येथील अधिकारी, कर्मचारी यांनी ग्राहकांशी सन्मानजवक वागणूक द्यावी तसेच शाखेचे मुख्य गेट बंद करणे थांबवावे, एटीएम मशिनमध्ये नियमितपणे रूपये भरावे व सुशिक्षित बेरोजगारांना मुद्रा लोण व इतर उद्योंगासाठी कर्ज मंजूर करावे आणि ज्येष्ठ नागरिक स्त्री-पुरूष व सर्व खातेदारांना बँकेत पिण्याच्या सुविधा देण्याची मागणी आहे.तक्रारीचा उपयोग नाहीशाखेत नोटांचा नेहमी तुटवडा आहे. वरिष्ठ शाखेकडून मागणी प्रमाणे नोटांचा पुरवठा केला जात नाही. त्यामुळे ग्राहकांना येथे वेळेवर स्वत:च्या खात्यातील लाखो रूपये कामानिमित्त काढता येत नाही. अनेकदा ग्राहकांनी यासंबंधी तक्रार केली. पण काहीच उपयोग होत नाही. वरून आम्हाला नोटांचा पुरवठा कमी होत असल्याची व्यवस्थापकांचे म्हणने आहे.एटीएम मशिन बंदकोंढा येथे बँक आॅफ इंडियाचे एकमेव एटीएम आहे. पण सध्या एटीएम मशिन शोभेची वस्तू बनली आहे. येथे एक महिना किंवा दोन महिन्यातून एखादेवेळी रूपये टाकले जाते. त्यानंतर सतत एटीएम बंद असते. या संबंधात व्यवस्थापकांशी अनेकदा संपर्क केले तर नेहमीप्रमाणे आम्ळचे शाखेत नोटांचा पुरवठा अत्यल्प होत आहे. त्यामुळे ग्राहकांचे विड्राल बँकेत द्यावे लागते म्हणून मशिनमध्ये रूपये ठेवत नसल्याचे सांगितले.माझे कर्मचारी ग्राहकांशी सभ्यतेची वागणूक देतात. सर्व योजनांचा निधी ग्रामपंचायत कार्यालयात जावून वाटप करतात. मुद्रा लोनचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. कॅशचा थोड्या प्रमाणात तुटवडा आहे.-बी.जी. सोनकुसरे, वरिष्ठ व्यवस्थापक, बँक आॅफ इंडिया कोंढा (कोसरा).
बँकेच्या कर्मचाऱ्यांचा ग्राहकांशी उर्मटपणा
By admin | Updated: May 21, 2017 00:21 IST