लोकमत न्यूज नेटवर्कमोहाड़ी : स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेअंतर्गत बस स्टॉप चौक मोहाडी येथे लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेली तालुका स्तर कायमस्वरूपी विक्री केंद्राची इमारत शासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ओसाड पडलेली असून या वास्तूचा उपयोग भाड्याने देण्यात येणाऱ्या वाहनांच्या वाहनतळ म्हणून उपयोग केला जात आहे. काही असामाजिक तत्व या वास्तूचा उपयोग जुगार खेळण्यासाठी व दारू पिण्यासाठी करीत आहेतबचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या हेतूने शासनाने मोहाडी येथील बस स्टॉप चौकातील मोक्याच्या जागी वस्तू विक्री केंद्रासाठी लाखो रुपये खर्चून देखणी वास्तू तयार केली.या वास्तूचे लोकार्पण सुद्धा पाच-सहा महिन्यांपूर्वी आमदार वाघमारे यांच्या हस्ते थाटामाटात करण्यात आले होते.मात्र या वास्तूचा उपयोग बचत गटातील महिलांना होतांना दिसत नाही. या वास्तूची देखभाल कोणत्याही एजन्सीकडून होत नसल्याने या ओसाड पडलेल्या वास्तूचा उपयोग येथील काही असामाजिक तत्त्व उचलत आहेत.सदर वास्तू समोरील पटांगणावर भाड्याने गाड्या देणाऱ्या वाहन मालकांनी कब्जा केला असून त्याला वाहनतळाचे स्वरूप देण्यात आले आहे. ही वास्तू लवकरात लवकर विक्री केंद्रासाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे
बचत गट भवन बनले वाहनतळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 22:39 IST
स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेअंतर्गत बस स्टॉप चौक मोहाडी येथे लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेली तालुका स्तर कायमस्वरूपी विक्री केंद्राची इमारत शासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ओसाड पडलेली असून या वास्तूचा उपयोग भाड्याने देण्यात येणाऱ्या वाहनांच्या वाहनतळ म्हणून उपयोग केला जात आहे. काही असामाजिक तत्व या वास्तूचा उपयोग जुगार खेळण्यासाठी व दारू पिण्यासाठी करीत आहेत
बचत गट भवन बनले वाहनतळ
ठळक मुद्देमोहाडीतील प्रकार : असामाजिक तत्त्व करताहेत इमारतीचा उपयोग