इटान ग्रामपंचायतमधील प्रकार : खंडविकास अधिकाऱ्याकडे तक्रारलाखांदूर : तालुक्यातील इटान येथील ग्रामपंचायत सरपंच व सचिवाने गावाच्या विकासासाठी नियोिजत केलेल्या निधीची अफरातफर केल्याचे १० मे च्या विशेष ग्रामसभेत उघड झाल्याने उच्चस्तरीय चौकशी करुन दोषी सरपंचाला पदावरुन कमी व सचिवावर निलंबनाची कार्यवाहीची मागणी ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ््यांनी खंडविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. सन २०१५-१६ या आर्थीक वषार्तील जमाखर्चाला मंजुरी देण्यासंदर्भात १ मे च्या ग्रामसभेत विषय ठेवण्यात आला होता. परंतु कोरम पूर्ण न झाल्याने १० मे रोजी विषेश ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सचिवाने जमा - खर्च वाचण्यास सुरुवात करताच विविध बाबीवर केलेल्या खर्चावर गावकऱ्यांनी आक्षेप घेतला. झाडाच्या लिलावातील २८०० रुपये सामान्य फंडात जमा न करता केवळ १००० रुपये जमा करुन १८०० रुपयांची दोघानी अफरातफर केल्याचे उघड झाले. मागासवर्गीयांच्या विकासासाठी ग्रामपंचायतकडून चार हजार रुपये खर्च केल्याची नोंद दिसून आली मात्र प्रत्येक्ष ही रक्कम परस्पर खर्च केल्याचे गावकऱ्यांपुढे दिसुन आले. यासंदर्भात माहिती विचारली असता चिंचेचे झाड तोडण्यासाठी चार हजार रुपये खर्च केल्याचे सांगण्यात आले. परंतु त्यानंतर पुन्हा गावकऱ्यांनी प्रश्नांचा भडिमार केला असता. तेच चार हजार रुपये बौध्द विहाराला खुर्ची खरेदी करुन दिल्याचे सांगण्यात आले. लगेच गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असता समाजाला खुर्च्या विकत घेऊन न देता परस्पर सरपंच व सचिवाने खोटे बिल सादर करुन चार हजार रुपये हडप केल्याचे सांगण्यात आले.गावाला नियमित पाणी पुरवठा सुरु असताना पाणी पुरवठा होत नसल्याचे कारण पुढ करुन निविदा न बोलविता साकोली येथील दुकानातून स्वत:चे मर्जीने महागडे ४१ हजार रुपयांचे सबमर्सिबल पंप खरेदी केल्याचे ग्रामसभेत सांगण्यात झाले. या खरेदीमध्ये दोघांनी पुन्हा मोठी रक्कम हडप केल्याचे दिसून आले. ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे दस्तावेज ठेवण्याकरिता गरज नसताना तीन लाकडी कपाट निविीा न मागविता १४ वित्त आयोग निधीमधून तब्बल ५५ हजाराची खरेदी केल्याचे ग्रामसभेत सचिवाकडून सांगण्यात आले. ग्रामपंचायतकडून खरेदी ही निविदा न मागता, परस्पर जादा दराने खरेदी करुन तसेच खोटे बिल सादर करुन शासनाचा निधीची सरपंच व सचिवाने अफरातफर केल्याचे विशेष ग्रामसभेत स्पष्ट झाले. त्यामुळे ग्रामपंचायत निधीची अफरातफर केल्याप्रकरणी सरपंच व सचिवाच्या आर्थिक व्यवहाराची व केलेल्या खर्चाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषी आढळल्यास सरपंचाला पदावरुन कमी करुन व सचिवावर निलंबनाची कार्यवाही करण्याची मागणीची तक्रार खंडविकास अधिकारी पंचायत समिती लाखांदूर यांचेकडे ग्रा. प. सदस्य गिरीश भागडकर व शैलेश मोटघरे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनीधी)
सरपंच व सचिवाने केली निधीची अफरातफर
By admin | Updated: May 17, 2016 00:25 IST