शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

अडीच हजारावर सापांना जीवदान देणारा सर्पमित्र समित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 05:00 IST

समितीला लहानपणापासूनच निर्सगाची आवड आहे. त्यानंतर त्याने निसर्गातील प्रत्येक गाेष्टीचा अभ्यास सुरू केला. किडे, झाडे, वेली, प्राणी यासाेबतच सापांचाही अभ्यास सुरु झाला. त्यात त्याला सापाचे जग वैशिष्टपूर्ण वाटले. सापाच्या हालचाली रचना, रंग यामुळे त्याचे आकर्षण वाढत गेले. अनेक पुस्तके आणि सर्पतज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेत अभ्यास सुरू केला. पहिला साप त्याने ७ जून २०११ राेजी पकडला आणि तेथून सुरू झाला त्याचा सर्पमित्र म्हणून प्रवास.

मुखरु बागडेलाेकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : साप... म्हणजे सरपटत येणारा मृत्यू हाच अनेकाचा समज. पण ताेच साप जेव्हा एखादा सर्पमित्र पकडताे तेव्हा आश्चर्य वाटते. ही मंडळी साप कसे पकडत असतील त्यांना भीती वाटत नाही का असे एक ना अनेक प्रश्न निर्माण हाेतात. सापांचे जग अद्भूत आहेत. अशाच या अद्भूत जगतात सर्प प्रेमाने एक तरुण झपाटला आहे. आतापर्यंत त्याने अडीच हजारांवर विषारी, बिन विषारी सापांना जीवदान दिले आहे. हा तरुण आहे, लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील सर्पमित्र समित हेमणे.समितीला लहानपणापासूनच निर्सगाची आवड आहे. त्यानंतर त्याने निसर्गातील प्रत्येक गाेष्टीचा अभ्यास सुरू केला. किडे, झाडे, वेली, प्राणी यासाेबतच सापांचाही अभ्यास सुरु झाला. त्यात त्याला सापाचे जग वैशिष्टपूर्ण वाटले. सापाच्या हालचाली रचना, रंग यामुळे त्याचे आकर्षण वाढत गेले. अनेक पुस्तके आणि सर्पतज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेत अभ्यास सुरू केला. पहिला साप त्याने ७ जून २०११ राेजी पकडला आणि तेथून सुरू झाला त्याचा सर्पमित्र म्हणून प्रवास.समित सांगताे वनविभाग जसे इतर प्राण्यांच्या बाबतीत गावात शिरले की त्याला पकडून जंगलात साेडून देतात. परंतु सापासाठी कुणी धावून येत नाही, अनेकदा परिसरातील नागरिकच सापाला यमसदनी धाडतात. पालांदूर परिसरात असे मारले जाणारे अनेक साप त्याने बघितले. तेथूनच त्याने ठरविले की आता परिसरात सापाला मारू द्यायचे नाही. समित परिसरातील ३०-३५ गावात कुठेही साप निघाला की पकडायला जाताे आणि त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करताे. असा हा सर्पमित्र सध्या पालांदूर परिसरात सर्वांच्या उत्सुकतेचा विषय झाला आहे. नागपंचमीच्या दिवशी समित सापाबद्दल असलेले नागरिकांचे गैरसमज दूर करणार आहे.

क्षणाचाही विलंब न लावता पाेहाेचताे गावातकुणाच्या घरी साप निघाला की समितीला फाेन येताे ताे क्षणाचाही विलंब न करता थेट साप निघालेल्या घरी पाेहाेचताे. रात्र असाे, पाऊस असाे, ऊन असाे की वारा सापाला पकडून ताे जीवदान देताे. यामाेबदल्यात ताे काेणताही पैसा घेत नाही. आता त्याच्या साेबतीला सुहास हेमणे, आदेश गाेंदाेळे, दीनदयाल गिरीपुंजे, वैभव हेमणे, साहिल बुरांडे ही मंडळीही आली आहेत.

 

टॅग्स :snakeसापNag Panchamiनागपंचमी