शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

अकरा गावातील सरपंचांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 21:40 IST

इटियाडोह धरणाचे पाणी लाखांदूर तालुक्यातील झरी तलावात सोडण्यास गत दहा वर्षापूर्वी मंजूरी मिळाली. मात्र अद्यापही पाणी सोडण्यात आले नाही. यासाठी सामाजिक कार्यकर्ते मानबिंदू दहिवले यांनी शासनाला वारंवार निवेदन पाठविले. मात्र त्याचा काही एक फायदा झाला नाही.

ठळक मुद्देमुर्झा येथे आंदोलन : इटियाडोह प्रकल्पाच्या पाण्याची सिंचनासाठी मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदिघोरी (मोठी) : इटियाडोह धरणाचे पाणी लाखांदूर तालुक्यातील झरी तलावात सोडण्यास गत दहा वर्षापूर्वी मंजूरी मिळाली. मात्र अद्यापही पाणी सोडण्यात आले नाही. यासाठी सामाजिक कार्यकर्ते मानबिंदू दहिवले यांनी शासनाला वारंवार निवेदन पाठविले. मात्र त्याचा काही एक फायदा झाला नाही. अखेर मंगळवारपासून ११ गावातील सरपंच, बेरोजगार युवक व शेतकऱ्यांनी मुर्झा येथे तंबू उभारून आमरण उपोषणाला सुरुवात केली.या तलावात इटियाडोह धरणाचे पाणी सोडल्यास जवळपास अकरा गावातील सिंचनाचा प्रश्न कायमस्वरुपी मिटू शकतो. याआधी मंजूरीपण मिळालेली होती. पण माशी कुठे शिंकली कळले नाही. या तलावाचे कामाला अजूनही सुरुवात झालेली नाही. इटियाडोह धरणाचे पाणी झरी तलावात आल्यास झरी, मुर्झा, पारडी, मालदा, चिचाळ, दहेगाव यासारख्या असंख्य गावांना शेतीला सिंचनाची पुरेपुर सोय उपलब्ध होऊ शकते.याशिवाय परिसरात बेरोजगारीचा गंभीर प्रश्न आवासून उभा ठाकला आहे. झरी, मुर्झा व पारडी हे गावे जंगलव्याप्त असून मोठ्या प्रमाणात वनसंपदा उपलब्ध आहे. त्यावर आधारित उद्योग उभारून बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची मागणी सुद्धा उपोषणकर्त्यांनी केली आहे. तसेच या ठिकाणी दहेगाव माइंस बरेच वर्षे कार्यरत होती. ती आता बंद असून माईन्स पूर्ववत सुरु करून बेरोजगारांना त्याठिकाणी रोजगार मिळेल या प्रमुख तीन कारणांसाठी सामाजिक कार्यकतर्ये मानबिंदू दहिवले यांच्या नेतृत्वात दिघोरीचे सरपंच अरुण गभणे, दिघोरीचे उपसरपंच रोहिदास देशमुख, राजूरी थुलकर, तावशीचे सरपंच रामदास बडोले, खोलमाराचे सरपंच अम्रृत मदनकर, मुर्झाचे सरपंच भोजराम ठलाल, चिचाळचे सरपंच लक्ष्मण जांगळे, चिकनाचे सरपंच ज्ञानेश्वर कांबळे, दहेगावचे सरपंच राकेश झाडे, पारडीचे सरपंच मिना ब्राम्हणकर, मुरमाडीचे सरपंच सुवर्णलता सोनटक्के, साखराचे सरपंच गीता बांगरे आणि शेतकरी संतोष गोंधोळे, ईश्वर मेश्राम, अभिमन पारधी, गजानन कावळे, नेपाल ठवकर, धर्मपाल किरझान, बाजीराव टेंभुर्णे, नीळकंठ डडमल, रामदास बन्सोड, लालदास कांबळे, दुधराम ठलाल, कैलाश सूर्यवंशी, नारायण मेश्राम, किशोर चव्हारे, देवराम कांबळे आणि उर्मिला ब्राम्हणकर उपोषणाला बसले आहेत. सदर उपोषणकर्त्यांच्या मागणीकडे शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.