शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
3
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
4
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
5
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
6
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
7
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
8
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती
9
Video - स्टंटगिरी! हिरो बनण्याच्या नादात मर्सिडीज थेट समुद्रात नेली, दलदलीत अडकली अन्..
10
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
11
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
12
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
13
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
14
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
15
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
16
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
17
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
18
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
19
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
20
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी

संस्कार ही जीवनाची शिदोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2017 00:31 IST

संस्कार ही जीवनाची खरी पुंजी असते. संस्काराची शिदोरी घेवूनच पुढील जीवनाची वाटचाल करीत उंच भरारी घ्यावी ....

कांचन गडकरी यांचे प्रतिपादन : नूतन कन्या शाळेचा वार्षिकोत्सव सोहळा भंडारा : संस्कार ही जीवनाची खरी पुंजी असते. संस्काराची शिदोरी घेवूनच पुढील जीवनाची वाटचाल करीत उंच भरारी घ्यावी असे मौलीक विचार कलाप्रेमी व समाजसेवेचे व्रत स्वीकारलेल्या कांचन गडकरी यांनी व्यक्त केले. स्थानिक नूतन कन्या शाळेच्या वार्षिकोत्सव उद्घाटन सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या उद्घाटीका व संस्कार भारती नागपूरच्या अध्यक्षा कांचन गडकरी, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अमिताभ पावडे प्रसिद्ध स्तंभ लेखक व समीक्षक नागपूर, सुनिल मेंढे कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष मनोहरराव बोंगीरवार, संस्थेचे कार्यवाह अ‍ॅड.एम.एल. भुरे, मुख्याध्यापिका नंदा नासरे, उपमुख्याध्यापक मोहन दाढी उपस्थित होते. नाजूकपणा नव्हे तर सक्षम, सुदृढ, सशक्त, विवेकवादी व विज्ञानवादी दृष्टीकोण हेच स्त्रीचे खरे आभूषण आहे. किंबहुना मुलींमधील सशक्त स्त्रीसामर्थ्य जागृत करण्याचा संदेश प्रमुख अतिथी अमिताभ पावडे यांनी दिला. याप्रसंगी विज्ञान, कला, इतिहास, भूगोल प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका नंदा नासरे यांनी केले. नूतनच्या कलिका नितीमान व गतीमान घडविण्याचा मानस त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. उपस्थितांच्या हस्ते हस्तलिखीत कलिका व प्रतिबिंब या वार्षिक वार्तापत्राचे विमोचन करून तसेच नूतन कन्याची वेबसाईट लाँच करून उद्घाटन झाल्याचे जाहीर करण्यात आले. शाळानायीका स्नेहा निखाडे, सई आंभोरकर यांनी अहवाल वाचन केले. गुणवत्ताप्राप्त विद्यार्थिनींना स्मृतीचिन्ह, रोख रक्कम देवून तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडू विद्यार्थिनींना पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले. एन.सी.सी. बेस्ट कॅडेट अवार्ड २०१६ मोनिका सार्वे या विद्यार्थिनीला प्रदान करण्यात आला. शाळेचे शिक्षक हेच शाळेच्या वैभवाचे व यशाचे खऱ्या अर्थाने धनी आहेत असे मत प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष बोंगीरवार यांनी केले. देश बदलत आहे व बदलत्या प्रवाहात नूतनच्या कलिका एक पाऊल पुढे आहेत. देश उभारणीसाठी आवश्यक मनुष्यबळ याच कलिकांमधून निपजेल अशी सदिच्छा संस्थेचे कार्यवाह अ‍ॅड.एम.एल. भुरे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे औचित्य साधून स्मार्ट सिटी ही संकल्पना निलू तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी तयार केलेल्या पावर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे दाखविण्यात आली. शालेय विद्यार्थिनींनी विविध गाण्यावर नृत्य सादर केले. रोहिणी मोहरील यांच्या मार्गदर्शनात तयार झालेली नोटाबंदी ही नाटिका विद्यार्थिनींनी सादर केली. कार्यक्रमाचे संचालन वार्षिकोत्सवाच्या प्रभारी शिक्षिका निलू तिडके यांनी केले. पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षिका सीमा चित्रीव यांनी हस्तलिखीतांच्या अंतरंगाबद्दल माहिती करून दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक मोहन दाढी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता तू बुद्धी दे तू तेज दे या गीताने झाली. याप्रसंगी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य रेखा पनके, झवर, शेखर बोरसे, माजी शिक्षणाधिकारी प्रमोद पनके, प्रशासकीय अधिकारी इंदिरा गायकवाड, माजी प्राचार्या शीला भुरे त्याचप्रमाणे शिक्षक पालक संघाचे सदस्य व पालकवर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवृंदाचे सहकार्य लाभले. याकरिता व्यवस्थापक मंडळ व सर्व पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. (नगर प्रतिनिधी)