शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलमधून पळविला रेतीभरला टिप्पर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:25 IST

महसूल विभागाच्या भरारी पथकाने जप्त करून येथील तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवलेला टिप्पर चालकाने संधी साधून पळवून नेल्याची घटना घडली. यामुळे तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. मोहाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून टिप्पर चालक व मालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

ठळक मुद्देमोहाडीची घटना : टिप्पर चालक व मालकावर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : महसूल विभागाच्या भरारी पथकाने जप्त करून येथील तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवलेला टिप्पर चालकाने संधी साधून पळवून नेल्याची घटना घडली. यामुळे तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. मोहाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून टिप्पर चालक व मालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.महसूल विभागाच्या भरारी पथकातील तलाठी वैभव ठाकरे यांनी मंगळवारी रोहा घाटावरील रेती तपासणी करताना टिप्पर (क्र. एमएच ३६ एए १३६२) विना परवाना वाहतूक करताना आढळून आला. टिप्पर चालक पवन कनोजे याला विचारपूस केली.सदर टिप्पर पालोरा येथील महादेव बुरडे यांच्या मालकीचा असल्याचे पुढे आले. पंचनामा करून सकाळी ८ वाजता ट्रॅक्टर मोहाडी तहसीलच्या प्रांगणात जमा करण्यात आला. मात्र टिप्पर चालकाने कुणी नसल्याची संधी साधून मुख्य दाराचे कुलूप तोडून रेती भरलेला टिप्पर पळवून नेला. हा प्रकार काही वेळातच लक्षात आला. मुख्य द्वाराचे कुलूप तुटलेले दिसून आले. त्यावरुन मोहाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी टिप्पर मालक महादेव बुरडे (५२) रा.पालोरा व चालक पवन कनोजे रा.नागपूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.२५ लाखांचा मुद्देमालजप्त केलेल्या टिप्परमध्ये पाच ब्रास रेती किंमत ५२ हजार आणि टिप्परची किंमत २५ लाख असा २५ लाख ५२ हजार रुपयांचा हा मुद्देमाल पळवून नेण्यात आला. रेती तस्करांची हिंमत वाढल्याचे या घटनेवरून दिसून येते. यामध्ये कोणाचा वरदहस्त आहे याची चौकशी करणे गरजेचे आहे.

टॅग्स :sandवाळू